पुणे,दि.१०:- पुणे महापालिकेने सुरु केलेल्या व्हाटस अप चॅट बॉट या सेवेत आता नागरीकांना
१९ विभागातील ८० सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहेत. व्हाटस अपच्या माध्यमातून नागरीकांना सेवा देणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरणार आहे.
पुणे महापालिकेच्या विभागांमार्फत अनेक सेवासुविधा दिल्या जातात. यामध्ये नागरी सेवा सुविधा, विभिन्न विभागांनी बिले भरणे, परवाना काढणे परवानगी घेणे, विविध दाखले ना हरकत प्रमाणपत्र अशी अनेक प्रकारची माहिती नागरिकांना सहजपणे या व्हाटस अप चॅट बॉट सेवेच्या माध्यमातून चोवीस तास मिळू शकेल. नागरिकांना या सुविधा पुणे महापालिकेचा ८८८८२५१००१ हा मोबा नंबर सेव करून घेता येतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. पुणे महानगरपालिका एका क्लिकवर माहिती देणारी भारतातील प्रथम पुणे महापालिका ठरणार आहे. त्यामध्ये विविध १९ विभागाच्या सेवा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये विविध प्रकारची मिळकत कर, पाणीपट्टी बिल, फेरीवाला देयक, जाहिरात फलक याची बिले भरता येतील. तसेच कुत्रा पाळणे परवाना, फांद्या छाटणी परवानगी, झाड तोडणे परवानगी, जाहिरात फलक परवाना,नवीन नळजोडणी अर्ज आदी परवाने मिळू शकतील. जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मिळकत कर ना हरकत प्रमाणपत्र, मिळकत हस्तंातरण, वारसाहक्क हस्तांतरण आदी प्रमाणपत्रे मिळू शकतील. या क्रमांकावर तक्रार दाखल करण्याची सोय केली आहे. तक्रारची सद्यस्थिती पाहणेची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मद्यस्थितीत नागरिकांकरिता खाली नमूद तक्रारी यांचा समावेश करण्यात आला आहे.
महापालिकेकडून राबविल्या जाणार्या शहरी गरीब आरोग्य योजना, पंडित दीनदयाळ अपघात विमा योजना,
पंतप्रधान आवास योजना,प्राणी दत्तक, खेळाडू दत्तक, मागासवर्गीय कल्याणकारी योजना,
अपंग कल्याणकारी योजना, महिला बालकल्याण योजना, महिला सक्षमीकरण योजना,
युवक कल्याणकारी योजनांची माहीती
व्हाटस अप चॅट बॉट८८८८२५१००१ हा मोबा नंबर सेव घेता येतील