पुणे,दि.०५:- पुणे शहरांतील कोथरूड येथील एका हॉस्टेल.परिसरात थांबलेल्या मुलींना कारमधील तरुणानी त्यांना “चलो बैठो घुमने जाते” असा आवाज दिला.घडलेला प्रकार तरुणींनी पोलिसांना सांगितला, आणि अवघ्या काही तासातच त्या रोड रोमियोचा शोध घेऊन त्यांची फिरायला जाण्याची “छोटीशी ख्वाईश” पुणे शहर पोलिसांच्या “लॉक अप” अखेर पूर्ण झाली ! अशा पद्धती तरुणीची छेड काढणाऱ्या पोलिसांनी चांगलाच “खाक्या” दाखविला. सोमवारी सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास कोथरूड येथीलच एका हॉस्टेल परिसरात 3 तरुणी थांबलेल्या होत्या.त्याच वेळी दोघेजण एका कारमध्युन तिथे आले होते. त्यांनी तरुणीकडे पाहून “चलो बैठो घुमने जाते” असा आवाज दिला. या प्रकारामुळे तरुणी काहीशा भांबवल्या. तरीही त्यांनी धीर राखत तेथून गेल्या. त्यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. दरम्यान, पोलिसांनी ही घडलेल्या प्रकारची तात्काळ आणि गांभीर्याने दाखल घेतली..तरुणींनी टवाळखोर तरुणाच्या कारचा नंबर लक्षात ठेवला होता. पोलिसांनी हा नंबर घेऊन अवघ्या एक तासातच त्यांचा शोध घेतला. त्यानंतर त्यांच्यावर थेट कारवाई करून तरुणांच्या फिरायला जाण्याचा आवडीनुसार त्यांना “लॉक अप” च्या थंडगार वातावरणाची सफर घडविली.