पुणे,दि.२५ :- पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात डिजे सिस्टिम लावून संगीत वाजवणाऱ्यावा. पब्लीक रेस्टॉरंट अॅण्ड बार,‘’वर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली आहे. पोलिसांनी हॉटेलमधून साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर जप्त केला आहे. ही कारवाई गुरूवार (दि.२४) केली.सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक कोरेगाव पार्क परिसरातील पब्लीक रेस्टॉरंट अॅण्ड बार,’ येथे मोठ्या आवाजात सांउड सिस्टिमवर संगीत वाजवले जात असल्याची गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकाला मिळाली. व त्याठिकाणी छापा टाकला असता मोठ्या आवाजात संगीत सुरु असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोन्ही हॉटेलमधील दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीचे सांउड सिस्टिम जप्त केले आहे. पोलिसांनी हॉटेलवर पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत ध्वनी प्रदुषण अधिनियमानुसार कारवाई केली. जप्त केलेला मुद्देमाल कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे.मागील दहा दिवसात सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडुन १) कोंढवा परिसरातील सिल्व्हर स्पुन हॉटेल २) विमानतळ परिसरातील ३ मस्कटेअर्स ३) कोरेगाव पार्क परिसरातील कोरा कॉकटेल बार अॅण्ड किचन ४ ) बंडगार्डन परीसरातील (राजाबहादुर मिल) मिलर्स लक्झरी क्लब ५) वन-८ कम्युनबार ६ ) कोरेगाव पार्क परिसरातील पब्लीक रेस्टॉरंट ॲण्ड बार अशा एकुण ०६ हॉटेलवर कारवाई करुन एकुण ११,३९,००० /- रु किंचे साऊंड सिस्टीम जप्त करण्यात आले आहेत.ही कारवाई .अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक,पोलीस सह आयुक्त, पुणे शहर,रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, अमोल झेंडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच सपोनि अश्विनी पाटील, सपोनि. अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, मनिषा पुकाळे, आण्णा माने, इरफान पठाण, संदीप कोळगे, पुष्पेंद्र चव्हाण व अमित जमदाडे या पथकाने केली आहे.