पुणे,दि.१५:- राज्य शासनाने बंदी घातलल्या हुक्का वर कोंढवा व विमाननगर दोन हाॅटेलमध्ये बेकायदा सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, छापा टाकून. पोलिसांनी केलेल्या कारवाईत हुक्का पात्र, सुगंधी तंबाखू असा पाच लाख एकोणीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने दोन हुक्का पार्लर चालकांच्या विरोधात कोंढवा व विमाननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.सिल्वर स्पुन हॉटेल ( रूफ टॉप) कोंढवा व ३ मस्क्युिटर्स, विमाननगर बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याची गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे कारवाईत हॉटेल मध्ये मोठया आवाजात डिजे सुरू असल्याचे आढळल्याने सदर हॉटेलवर कारवाई करून पाच लाख एकोणीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. केली. दोन्ही हाॅटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,
पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, पोलीस सहआयुक्त, पुणे शहर,रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, श्रीनिवास घाडगे. पोलीस उप आयुक्त गुन्हे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, मनिषा पुकाळे, आण्णा माने, हणमंत कांबळे, इरफान पठाण, अमित जमदाडे, पुष्णेंद्र चव्हाण या पथकाने यशस्वी केली आहे..