पुणे तिथे काय उणे म्हणी नुसार काही तोतया पत्रकारांचे आयटी मधील वेब डेव्हलपर सारखे कार्ड लावून काही पत्रकार पुण्यात फिरत असल्याचे पुण्यात पाहायला मिळत आहे युट्युब, किंवा वेबसाईट, साप्ताहिक, पेपर काढून काही स्वतःला संपादक व पत्रकार म्हणणारे काही पत्रकार स्वतःच्या फायद्यासाठी काही अधिकाऱ्यांचे किंवा शासकीय कामगारांची व इतर व्यवसायकांचे व्हिडिओ किंवा फोटो काढून ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार पुण्यात पाहण्यास मिळत आहे. तसे काही दिवसांपूर्वी खंडणीचाही गुन्हा पुण्यात काही खंडणी खोर पत्रकारांवर झालेल्या आहे त्यामुळे आता इतर पत्रकारांचे चांगले चारित्र्यही कलंकित होतांना दिसत आहे.तर काही पत्रकार यांना पत्रकारितेची कोणतीही पत्रकारकिचा अनुभव नसतानाही पत्रकार म्हणत ब्लॅकमेल करून पैसा गोळा करीत आहेत काही तोतया पत्रकार परमीट रुम मध्ये दारू पित असलेल्या नागरिकांनचे किंवा खोपोली परिसरातील रायगड हद्दीत असणारे लेडीज बारमध्ये आलेल्या ग्राहकांची डान्स करताना लोकांनाचे व्हिडिओ काडुण ब्लॅकमेलिंग करून धमकावून त्यांच्याकडुन पैसे घेताना दिसत आहे.? तर, अशा कृत्यामुळे अनेकवेळा बारमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी आशा पत्रकाराला पकडले आहे. आशा पत्रकाराचा मासिक पगार किंवा मानधन नसताना किंवा कोणत्याही त्याचा व्यवसाय नसताना काही तोतया पत्रकार वेबसाईटचे डेव्हलपिंग, वर्षाचा खर्च किंवा स्वतःचा खर्च कुठून भागवतो? याची चौकशी व्हायला हवी जेणेकरून येणाऱ्या काळात प्रामाणिक आणि कष्टाळू पत्रकारिता किंवा छंद म्हणून पत्रकारकी करणारी पत्रकारिता सुरक्षित राहील.