ठाणे,दि.१२ :- काल सकाळी १०.०० वा. सुमारास घोडबंदर रोड, गायमुख चौपाटी, जी.बी. रोड, ठाणे (पश्चिम) येथे दोन इसम इनोव्हा कारमधुन बनावट भारतीय चलनी नोटा विक्री करण्याकरीता येणार आहेत अशी खात्री गोपनीय बातमी गुन्हे शाखा, ५ च्या वरिष्ठ पो. निरी. विकास घोडके यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ टिम गठीत करण्यात येवुन, गायमुख चौपाटी, जी.बी. रोड, ठाणे (पश्चिम) येथे सापळा लावुन बातमीमधील आशया प्रमाणे १०.४० वा. चे सुमारास आरोपी नामे १) राम हरी शर्मा वय ५२ वर्षे राह. एम / ६०३, पेनिन्सुला पार्क, न्यु विवा कॉलेज रोड, बोळींज, विरार वेस्ट, डी. मार्ट जवळ, पालघर २) राजेंद्र रघुनाथ राउत वय ५८ राह परनाई नाका, शिवप्रभा हॉटेल समोर घर नं. २१९ कुरगांव, ता. जि. पालघर यांना इनोव्हा गाडी नं. एम.एच ०४ डीबी ५४११ सह शिताफीने ताब्यात घेतले असता, त्याचे कडून २ हजार रुपये दराच्या वेगवेगळया नंबरच्या नोटा असलेले एकुण ४०० बंडल एकुण रु.आठ कोटी) च्या बनावट भारतीय चलनी नोटा मिळुन आल्या. त्याबाबत त्यांचेकडे विचारणा केली असता, त्यांनी सांगीतले की, सदरच्या बनावट नोटा इसम नामे मदन चौव्हाण याचे मदतीने पालघर येथील गोडावून येथे छापून त्या बनावट नोटा विक्री करण्याकरीता आले आहोत. त्यावरून नमुद आरोपींचे विरुद्ध सहा. पो. निरी. अविनाश रामदास महाजन यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयांचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अरुण क्षिरसागर, नेमणुक गुन्हे शाखा, घटक ५, हे करीत आहे. यातील बनावट नोटा या आरोपीत क्र १ राम हरी शर्मा यांचे पालघर येथील टेक इंडस्ट्रीयल इस्टेट मधील गाळ्यामध्ये संगणक व प्रिन्टरच्या सहाय्याने बनविल्या असल्याची माहीती मिळत असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.सदरची कारवाई ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग, पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, सहा. पोलीस आयुक्त, शोध – १,अशोक राजपुत, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वागळे युनिट-५, ठाणे चे वरिष्ठ पो. निरी. विकास घोडके, पो. निरी. अरुण क्षिरसागर, सहा. पो. निरी. भुषण शिंदे, स. पो. निरी अविनाश महाजन, पो.उप. निरी शिवाजी कानडे, स.पो.उप.निरी शशिकांत सालदुर, पो. हवा. सुनिल रावते, पो. हवा. रोहीदास रावते, पो. हवा. सुनिल निकम, पो. हवा. संदिप शिंदे, पो. हवा. विजय पाटील, पो. हवा. अजय फराटे, पो. हवा जगदिश न्हावळदे, पो. हवा शशिकांत नागपुरे, पो.ना. तेजस ठाणेकर, पो. ना. उत्तम शेळके, पो. ना. रघुनाथ गार्डे, पो. कॉ. शंकर परब, चालक पो. कॉ. यश यादव या पथकाने केली आहे.वरिल कामगिरी ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वागळे युनिट ५, ठाणे यांनी केलेली आहे.