पुणे, दि.१०:-पुण्यातील एका बांधकाम व्यवसाईक यांचे ऑफीस नं. ४९ पहीला मजला, सुमित प्लाझा, निसर्ग मंगल कार्यालयासमोर, गुलटेकडी मार्केटयार्ड, पुणे एका साप्ताहिकाच्या संपादकाला ला १ वर्षापुर्वी एका साप्ताहिक पेपर साठी व इतर व्यवसाय साठी भाडयाने दिले होते. सदरचे भाडेकराराची मुदत संपल्याने त्यांनी काही दिवसांपुर्वीच आरोपीस सदरचे ऑफिस / गाळा सोडण्याबाबत सांगितले होते. त्याने गाळयाचे भाडे थकवल्याने, तसेच त्याची भाडेकराराची मुदत संपल्याने त्यांनी त्यास मुदत देण्यास नकार दिला. होता व या गोष्टीचा मनात राग आल्याने गायकवाड याने त्यांचाशी भांडण करुन,नविन ठिकाणी जागा घेण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी करुन भाडेकरार मुदतवाढ किंवा २ लाख रुपये न दिल्यास पोलीसात तुझ्या विरूद्ध ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल करीन अशी धमकी दिली होती. तसा फिर्यादीने अर्ज स्वारगेट पोलीस स्टेशनला दाखल केला होता.फिर्यादी यांची तक्रारीवरून विजय गायकवाड याचेवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा आसे स्वारगेट पोलीस ठाण्यात करण्यात आला होता त्याच्यावरून,त्यास अटक करण्यात आलेली आहे.
अटक आरोपी यांच्याकडे / त्याच्या कार्यालयात अनेक वेग-वेगळया फर्मचे शिक्के, लेटरर्स व शाळांचे दाखल्यांच्या प्रती सापडले असुन,त्याने अनेकांकडुन खंडणी उकळल्याचे तसेच ऍडमिशनच्या व लोन करुन देण्याच्या नावाखाली फसवणुक केल्याची व इतर पोलीस ठाण्यात खोटे ऍट्रॉसिटी गुन्हे दाखल केले असल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे विजय गायकवाड हा वारंवार खोटे ऍट्रॉसिटी गुन्हे दाखल करण्याकरीता पोलीसांच्या गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारी अर्जाची चौकशी पोलीस करत होते. परंतु गायकवाड याने त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. स्वारगेट पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी अशोक इंदलकर यांना समक्ष भेटुन तात्काळ गुन्हा दाखल करण्याचा ठेका धरला.होता व अशोक इंदलकर यांनी संबंधीत तपासी अधिकाऱ्याकडील प्रकरण पाहुन तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यास गुन्हा दाखल करण्याबाबत आश्वासन दिले. परंतु गायकवाड याने सुप्रीम कोर्टाचे तसे निकाल आहेत वगैरे सांगुन तुम्ही तात्काळ तक्रार नाही घेतल्यास पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढनार असे सांगुन तो निघुन गेला. सोमवारी दि. ०७/११/२०२२ रोजी त्याने पक्षातर्फे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावेळी त्याने पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांच्या शिष्ठ मंडळाचे तसे रिसतर निवेदन स्विकारुन. सह पोलीस आयुक्त, संदीप कर्निक यांनी योग्य कारवाई करण्याबाबत सुचनाही दिल्या. परंतु .आयुक्तांनाच भेटण्याचा हट्ट त्यांनी धरला. अन्यथा घंटानाद आंदोलन करण्याची धमकी दिली.होती व दबाव आणत असतो. आजुन कोठे फसवणूक केली आहे का स्वारगेट तपास करीत असुन,त्याच्याबाबत काही तक्रार असल्यास न घाबरता स्वारगेट पोलीस स्टेशनला तक्रार देण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.
सदरची कारवाई संजय डहाळे,अपर पोलीस आयुक्त,पश्चिम प्रादेशिक विभाग,पुणे शहर, सागर पाटील,पोलीस उप आयुक्त,परि-2,पुणे शहर, श्रीमती.सुषमा चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग,पुणे शहर,अशोक इंदलकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,स्वारगेट पोलीस ठाणे पुणे सोमनाथ जाधव,पोलीस निरीक्षक,(गुन्हे),स्वारगेट पोलीस ठाणे,पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक,प्रशांत संदे, अंमलदार गुन्हयाचा पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक,प्रशांत संदे हे करीत आहेत.