पुणे,दि.१८:- खुनाच्या गुन्ह्यात पॅरोलवर बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगाराला पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनने अटक केली आहेत.त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल आणि काडतुस जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई येरवडा येथील मच्छी मार्केट गाडीतळ येथे करण्यात आली आहे.
रितीक राजु साठे (वय – 21 रा. मच्छी मार्केट समोर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर येरवडा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम, महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत दाखल करण्यात आला आहे.
खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी अंमलदार हे येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेल्ट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार मच्छी मार्केट गाडीतळ येथे थांबला असून त्याच्याकडे दोन गावठी पिस्टल व काडतुसे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी रितीक साठे याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आले.
आरोपी रितीक साठे हा पुणे शहर पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो काही दिवसांपुर्वी येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात पॅरोलवर बाहेर आला आहे. तो सध्या पोलीस कस्टडीमध्ये असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव करीत आहेत.
. सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता , पोलीस सह आयुक्त , संदिप कर्णिक , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त , गुन्हे श्रीनिवास घाडगे , सहा . पोलीस आयुक्त , गुन्हे – २ , श्री नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली न पोलीस निरीक्षक , बालाजी पांढरे , सहा.पो.निरी . चांगदेव सजगणे , पोलीस उपनिरीक्षक , मोहनदास जाधव , पोलीस अंमलदार सचिन अहिवळे , विजय गुरव , प्रदिप शितोळे , शैलेश सुर्वे , राहुल उत्तरकर , विनोद साळुंके , अनिल मेंगडे , संग्राम शिनगारे , सैदोबा भोजराव , सुरेंद्र साबळे , अमोल पेलाणे , चेतन आपटे , चेतन शिरोळकर , प्रदिप गाडे , किशोर बर्गे , पवन भोसले , रवि सपकाळ व महीला पोलीस अंमलदार , आशा कोळेकर , रुपाली कर्णवर यांनी केलेली आहे .