पुणे,दि.१२:- पुणे शहर आणि परिसरातून वाहन चोरी करणाऱ्या वाहन चोराला चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक महेश भोसले व पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके यांनी अटक केली.अटक करण्यात आलेला आरोपी सराईत गुन्हेगार असून पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख २७ हजार रुपये किमतीच्या ७ दुचाकी जप्त केल्या आहेत. या दुचाकी पुणे शहरांतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्या आहेत.
विवेक वाल्मीक गायकवाड , वय २० वर्षे , रा . समर्थ कॉलनी , गुजरनगर थेरगांव पुणे मुळगांव बेटजवळगा ता . उमरगा जि . उस्मानाबाद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पथकातील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर मुळे व किशोर दुशिंग यांनी औंध पुणे येथील डी मार्ट समोरील दुचाकी वाहन पार्कीगकेली.आहे चतुःश्रृंगी हद्दीत दुचाकी चोरीच्या घटना वाढत असल्याने चोरांचा शोध घेत होते. त्यावेळी माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार विवेक वाल्मीक गायकवाड ,हा डी मार्ट समोरील दुचाकी वाहन पार्कीगमध्ये ट्रॅप लावुन थांबले असतांना सदर ठिकाणी एक संशयीत इसम पार्कींग मधील दुचाकी वाहनांना चाव्या लावत असल्याचे दिसुन आल्याने त्या संशयीत इसमास ताब्यात घेवुन त्याच्याडके विचारणा केली असता त्याने त्याचे नाव विवेक वाल्मीक गायकवाड याला दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता दुचाकी पुणे शहर व इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने काही पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीचे गुन्हे केल्याची माहिती मिळाली. आरोपीची अधिक चौकशी केली.आसता चौकशी दरम्यान त्याने नवनवीन दुचाकी वाहने वापरण्याचा छंद असलेल्या सांगितले व पोलिसांनी. आरोपी कडुण ७ दुचाकी जप्त केल्या आहे
आरोपीचे गुन्हे चतुःश्रृंगी पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त , पुणे शहर अमिताभ गुप्ता ,पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक , अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर नामदेव चव्हाण ,पोलीस उप आयुक्त परिमंडळ -४ पुणे शहर रोहिदास पवार , सहा . पोलीस आयुक्त , खडकी विभाग पुणे शहर श्रीमती आरती बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक , चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन राजकुमार वाघचवरे , पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले , रुपेश चाळके , पोलीस अमंलदार ज्ञानेश्वर मुळे , किशोर दुशिंग , प्रकाश आव्हाड , तेजस चोपडे , दिनेश गडाकुंश , श्रीकांत वाघवले , इरफान मोमीन , बाबा दांगडे , सुधीर माने , आशिष निमसे , बाबुलाल तांदळे , कुणाल माने , गणेश चौधर यांनी केली आहे . दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक महेश भोसले हे करीत आहेत .