दौंड,दि.०१:-दौंड शहरात वाढते लोक संख्या पाहता दौंड नगर पालिकेने अनधिकृत अतिक्रमणे हटविण्याच धोरण अवलंबिले आहे.अजून पुढील दोन दिवस हि मोहिम चालू राहणार आहे.
या वेळी दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याशी झुंजार च्या प्रतिनिधीने बातचीत केली असता त्यांनी असे म्हटले की, गेल्या काही दिवसापासून स्पीकर द्वारे अनधिकृत बांधकाम नागरिकांना सूचना देण्यात आले होते.व काल पासून अतिक्रमणे हटविली जात आहेत .कुरकुंभ मोरी ते भाजी मंडई इथपर्यंत अतिक्रमणे हटविली आहेत.तसेच शहरातील इतर ठिकाणी सुद्धा ही मोहीम राबवली जाणार आहे.इथून पुढे अतिक्रमणे होणार नाही या साठी ऐक स्पेशियल टीम तयार केली.तसेच ज्यांच उद्योग धंदे यांचे नुकसान झाले त्यांना व नागरिकांना नगर पालिकेने त्यांच्या मानव विकास योजेअंतर्गत अनेक योजना आहेत .उद्योग धंद्यांना कर्ज योजना असतील अश्या काही योजनेने अतिक्रमण ग्रस्त नागरिक यांना सहाय्य केले जाईल असे सुचीतही केले.
यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केले होते.
तसेच नागरिकांनी गर्दी केली होती त्यांच्या ही प्रतिक्रिया जाणून घेतल्या .काहींनी कार्यवाही योग्य आहे तर काही चुकीची कार्यवाही आहे असे मत व्यक्त केले.तर काहींनी तर शहर तालुक्यातील अतिक्रमणे हटविली गेली पाहिजेत अशी मागणीही जोर धरू लागली आहे.