पुणे,दि.०९ :-पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ट्विटरच्या माध्यमातून पुणेकर नागरीकांशी थेट संवाद साधून नागरीकांच्या समस्या जाणुन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला.या कार्य क्रमाला नागरीकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. पोलिस आयुक्त यांच्या कार्यक्रमात 250 पेक्षा जास्त पुण्यातील नागरीकांनी सहभाग घेऊन प्रश्न विचारले तर 469 पेक्षा अधिक रिव्टिट केले. या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहून पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी देखील प्रत्येक प्रश्नास मार्मिक आणि अचूक उत्तर दिले.
नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये प्रामुख्याने वाहतूक समस्या, सायबर फसवणूक व महिलांविषयीच्या तक्रारी यांचा समावेश होता.त्यातील काही महत्वाच्या 35 ते 40 प्रश्नांची उत्तरे पोलिस आयुक्तांनी स्वत: नागरिकांना व्टिट करून दिली.अशा प्रकारे नागरीकांच्या विविध प्रश्नांस आयुक्तांनी दिलखुलास उत्तरे दिल्याने पुण्यातील नागरिकांनी आभार मानून असे उपक्रम वारंवार घ्यावेत अशी विनंती केली.