पुणे,दि.२४:- : वर्षश्राद्ध म्हटंले की नातलग, आप्तेष्टांना बोलावून दिवंगत व्यक्तीच्या आठवणींना उजाळा दिला जातो. तसेच रूढी, परांपरेच्या नावाखाली मोठा खर्च केला जातो. मात्र या प्रथेला फाटा देत प्रतीक अमर दांगट या नातवाने आपल्या कै. युवराज दांगट या आजोबांच्या वर्षश्राद्धाचा अनावश्यक खर्च टाळून वृद्धाश्रमाला देणगी देत नवीन पायंडा पाडला आहे. वर्षश्राद्धाला होणारा खर्च टाळून त्यांनी नवी पेठेतील निवारा वृद्धाश्रमाला देणगी दिली आहे. जेणेकरून या पैशाचा उपयोग इतर वृद्धांच्या मदतीसाठी, औषधोपचारांसाठी होईल. सामाजिक प्रतिष्ठा किंवा बडेजाव न करता गरजूंना महाविद्यालयीन विद्यार्थी असलेल्या प्रतीक दांगट ने दिलेली देणगी ही समाजाला एक आदर्श घालून देणारी आहे.