पिंपरी चिंचवड, दि.२५ :- डांगे चौकातील इलिमेंट्स द फॅमिली स्पा या स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पिंपरी चिंचवडच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा मारून कारवाई केली.पिंपरी : स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला यातून सात पीडित महिलांची सुटका करण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभाग/अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षच्या पोलिसांनी डांगे चौक, लिंक रोड, वाकड येथे सोमवारी (दि. २४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही कारवाई केली.
शुभांकर महेश जवाजीवार (वय २७, रा. जुना बाजार, खडकी, पुणे), रत्नप्रभा मोतीलाल बत्तीसे (वय ४३, रा. काळेवाडी फाटा, वाकड, मूळ रा. धरणगाव, जिल्हा जळगाव) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस कर्मचारी संगीता जाधव यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डांगे चौक येथील एलेमेंट्स द फॅमिली स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यात सात पीडित महिलांची सुटका केली. आरोपी हे पीडित महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होते, असे फिर्यादीत नमूद आहे.याप्रकरणी महिला पोलीस नाईक संगीता जाधव यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.व पोलिसांनी सात महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके तपास करीत आहेत.