श्रीगोंदा,दि.२४ :- रस्त्याच्या कडेला थांबवला ट्रक स्कार्पिओतून आलेल्या तिघां चोरट्यांनी ट्रकच पळवून नेल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली होती व अधिक माहिती अशी की, ट्रक चालक मुकिंदा पाचपुते हे त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र.एमएच १६ एई ८१९३) हा श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव फाटा परिसरातून जात होते.यावेळी त्यांनी लघुशंका करण्यासाठी सदरचा ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवला व ते लघुशंका करण्यासाठी गेले. यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओमधून (एमएच १२ सीएन १०) आलेल्या भारत विष्णू धोत्रे (रा.उरळी कांचन ता.हवेली.जि.पुणे), नितीन शिवाजी दरेकर (रा.शिंदेवाडी ता.आष्टी.जि.बीड) व एक अनोळखी इसम आशा तिघांनी ट्रक चोरून नेला.याबाबत ट्रकचालक मुकिंदा पाचपुते यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिसांनी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला होता व. गुप्त सदर गुन्ह्याचा तपास चालु असताना पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना गोपनीय बातमी मिळाली की सदरच्या गुन्ह्यातील ट्रक ही 1 ) भारत विष्णु धोत्रे रा . तुपेवस्ती उरुळीकांचन पुणे , 2 ) सतिष शिवाजी दरेकर रा . सिध्देवाडी ता.आष्टी जि.बिड 3 ) पोपट विठ्ठल आबनावे रा . गोळीबार मैदान , उरुळीकांचन पुणे यांनी चोरुन नेली असल्याचे समजले वरुन त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांना सुचना देवुन रवाना केले असता मिळालेल्या माहीती तील ईसम नामे 1 ) भारत विष्णु धोत्रे वय 34 वर्षे , रा . तुपेवस्ती उरुळीकांचन पुणे , 2 ) सतिष शिवाजी दरेकर वय 34 वर्षे , रा . सिध्देवाडी ता.आष्टी जि.बिड 3 ) पोपट विठ्ठल आबनावे वय 57 वर्षे , रा . गोळीबार मैदान , उरुळीकांचन पुणे यांना उरुळी कांचन येथुन ताब्यात घेवून त्यांना चोरीस गेलेल्या मालट्रक बाबत विचारपुस केली असता त्यांनी सुरवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली . त्यांना विश्वासात घेवून विचारले असता त्यांनी गुन्ह्यातील चोरीस गेलेले वाहन टाटा कंपनीची मालट्रक आर.टी.ओ.नं. एम.एच .16 ए.ई .8193 ही यवत जि . पुणे येथे लपवुन ठेवलेली दाखविली व गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी एम . एच . 12 सी.एन .10 असा एकुण 6,00,000 / – ( सहा लाख रुपये किंमतीचा ) मिळुन आल्याने जप्त केली आहे . सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील साहेब , अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री रामराव ढिकले , सपोनि . दिलीप तेजनकर , सफो अंकुश ढवळे , पोना गोकुळ इंगवले , पोको प्रकाश मांडगे , पोकॉ किरण बोराडे , पोकॉ दादा टाके , पोकॉ अमोल कोतकर यांनी केली आहे .