पुणे,दि.१७ :- पुणे शहरात विनामास्क फिरणा-यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. रविवारी (दि. 16) पुणे शहर पोलिसांनी 718 नागरिकांवर कारवाई केली आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, गर्दी न करणे, उघड्यावर न थुंकणे अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत.मात्र अनेक नागरिक शासनाच्या सूचना आणि आवाहनाला थेट केराची टोपली दाखवतात. त्यांना योग्य समज मिळावी तसेच कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी पोलिसांकडून नियमभंग करणा-या नागरिकांवर कारवाई केली जात आहे.पुणे शहरात काही हॉटेलमध्ये नागरिकांची गर्दी झाल्याने पोलिसांनी हॉटेल चालकावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच मास्क न वापरणा-या 718 जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.3,59,000 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे