पुणे ग्रामीण, दि.०९ :- पुणे ग्रामीण भरोसा सेल यांना दि. ०८/०१/२०२२ रोजी चाईल्ड लाईन कडुन बालविवाहसंबंधी एक गोपनीय माहिती मिळाली की , एक अल्पवयीन मुलीचे लग्न नवी सांगवी पुणे मध्ये राहणाऱ्या मुलाशी दि ०९ / ०१/२०२२ रोजी १२:४५ वाजता जांबुत, शिरूर या ठिकाणी होणार आहे अशी पोलिसांना माहिती प्राप्त झाल्याने मपोसई माधवी देशमुख , भरोसा सेल पुणे ग्रामीण यांनी पोलीस निरीक्षक राऊत , शिरूर पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क करून सदर घटनेबाबत सविस्तर माहिती दिली व तात्काळ बालविवाह रोखणे गरजेचे असले बाबत कळविले व सदर बाबत वेळोवेळी पाठपुरावा करून होणारा बालविवाह थांबवुन बालविवाह लावून देणे हा कायद्याने गुन्हा आहे असे समजावुन सांगून सदरचा बालविवाह रोखण्यात भरोसा सेल पुणे ग्रामीण व शिरूर पोलीस स्टेशन यांना यश आले . सदरची कामगिरी ही डॉ. अभिनव देशमुख , पोलीस अधीक्षक सो , पुणे ग्रामीण , मिलींद मोहिते , अपर पोलीस अधीक्षक , बारामती विभाग , पुणे ग्रामीण , राहुल धस , उपविभागीय पोलीस अधिकारी , दौड विभाग , पोलीस निरीक्षक शेळके , स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राउत , सपोनि संदीप कांबळे , पोउपनि सुरेश गीते , भरोसा सेल पुणे ग्रामीण , मपोसई माधवी देशमुख , सहा फो जगताप , मपोना सीमा दुर्गाडे , मपोका वाल्मिकी , शेलार , शिरूर पोलीस स्टेशन पोकॉ दहिफळे , सांगळे , कारखीले , थेऊरकर , चालक साठे यांनी केली आहे . ,