पिंपरी चिंचवड, दि.०८ :- पूवो ग्रुप फेसबुक तर्फे पुण्यातील आय. टी. रेसिडेन्स हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर येथील ग्राहकांसाठी मकर संक्रांति स्पेशल पूवो शॉपिंग फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. आज पिपरी चे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते या शॉपिंग फेस्टचे उदघाटन झाले.
मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर पूवो फेसबुक ग्रुपच्या वतीने पिंपळे सौदागर मधील विमल गार्डन येथे तीन दिवसाच्या शॉपिंग फेस्ट चे आयोजन करण्यात आले आहे. आज पहिल्या दिवशी पिपरी चे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते या शॉपिंग फेस्टचे उदघाटन झाले. या वेळी आमदार जगताप यांनी महिला उद्योजकांच्या स्टॉल वरती जाऊन संवाद साधला, करोना महामारीमुळे येणाऱ्या महिला उद्योजकांच्या अडीअडचणीही एकूण घेतल्या. महिलांच्या स्टॉलला प्रत्यक्ष्य भेट दिल्याने या उद्योजक महिलांचा उत्साह वाढला. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते पुवो शॉपिंग फेस्ट च्या उदघाटनाची फीत ककापण्यात आली तसेच दीप प्रजोलन करण्यात आले. या वेळी आमदार जगताप यांनी पुवो फेसबुक ग्रुपच्या या शॉपिंग फेस्टसाठी शुभेच्छाही दिल्या.
या वेळी पिंपरी चिंचवडचे नगरसेवक शत्रुघन काटे, भाजपच्या पिंपरी चिंचवड महिला मोर्च्या अध्यक्ष्या कुंदा भिसे, पिंपरी चिंचवड महिला मोर्च्या उप अध्यक्ष्या कांचन काटे, उन्नती फॉउंडेशनचे संजय भिसे, आदी उपस्थित होते. नगरसेवक शत्रुघन काटे यांनी देखील पुवो फेसबुक ग्रुप शुभेच्छा दिल्या. तसेच कोरोना प्रतिबंधकचे नियम पाळण्याचे आवाहन केले.
या तीन दिवसीय प्रदर्शनातून तुम्हाला सुंदर शोभेच्या वस्तू, हातमागावरचे फॅब्रिक, महाराष्ट्र तसेच राजस्थान, केरळ येथून तयार होणाऱ्या हँड ब्लॉक प्रिंटेड फाब्रिक डिझाईनर साड्या, खण साड्या, रेडी टू वेअर ब्लाऊज, कॉटन मेन्स शर्ट्स आणि किड्स वेअर, सुगंधी हॅन्डमेड सोप, ब्युटी प्रॉडक्ट्स, फोटोवरून भरतकाम करून रेखाटलेले व्यक्तिचित्र, भित्तिचित्र, लग्न सण-समारंभाला देण्यासारख्या भेटवस्तू, नाजूक कोरीवकाम केलेले फॅब्रिक आणि ट्रॅडिशनल दागिने घरगुती खाद्यपदार्थ, घर व किचन यासाठी उपयुक्त गोष्टी यांची खरेदी करता येईल, या मकर संक्रांती स्पेशल शॉपिंग फेस्ट मध्ये शंभराहून अधिक स्टॉल असणार आहेत. या स्टॉल मधून खरेदीच्या अनानंदासोबतच रुचकर अश्या खाद्यपदार्थांचंही आस्वाद घेता येणार आहे. या ठिकाणी करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून या कार्यक्रमाचे आयोज केले आहे.