श्रीगोंदा,दि१५ :- नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कारखान्याचे विद्यमान चेअरमन राजेंद्र नागवडे व त्याचे बंधू दिपक नागवडे यांनी मोठ्या शक्तिप्रदर्शनाची तयारी केली होती त्यासाठी गावोगावी कार्यकर्त्यांनपर्यंत निरोप पाठवले होते, सोशल मीडिया मधूनही सभासदानी उपस्थित राहावे असे आवाहन करून देखील सभासदानी आज पाठ फिरवलेली दिसून आली.
श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या आवारात नागवडे बंधू वाजत गाजत दाखल झाले पण त्यांच्या बरोबर दोन तिनशेच कार्यकर्ते दिसून आले.त्यामध्येही त्याच्या संस्थेच्याच कामगारांची बहुगर्दी दिसून आली, मात्र तालुक्यातील सभासदांना निमंत्रण देऊन सुद्धा सभासद संख्या कमी दिसून आल्याने शक्तिप्रदर्शनाचा पुरता फज्जा उडाला.त्यामध्येही टनाला २१७ रुपये एफ.आर.पी रक्कम कमी दिल्याने ऊस उत्पादक सभासदांमध्ये नाराजी आहे अशी सभासदांमधून दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.त्याचा फटका सत्ताधारी नागवडेना बसतो का हे निवडणूकीच्या निकालात दिसून येईल.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे