राजगड,पुणे,दि २८ :- राजगड पोलीसांनी मौजे दिवळे गावचे हद्दीत सासवड ते कापूरहोळ रोडवर ३ लाख ३३६ रुपयांची देशी-विदेशी दारू व ३ लाख रुपयांची दारू वाहतूक करणारी गाडी जप्त केली. दि. २७ नोव्हेंबर रोजी १३:४५ वाजता ही पोलीस कारवाई केली असून दि.२७ नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंद झाला आहे.पोलीस नाईक नाना मारुती मदने यांनी याबाबत राजगड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून रमेश रामचंद्र ढवळे वय ४७ धंदा रा.भेलकेवाडी , ता भोर , जि पुणे
या आरोपींवर कारवाई करण्यात आली.दि. २७ नोव्हेंबर रोजी राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी किकवी पोलीस दुरक्षेत्र गस्तघालतअसताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली कि सासवड ते कापूरहोळ रोडने एक मारूती सुझुकी कंपनीचा टेम्पो यामध्ये देशी विदेशी कंपनीची दारू घेवुन दोन इसम कापूरहोळकडे टेम्पो घेवून येत असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्यामुळे दोन पंच व पोलिस निरीक्षक, सचीन पाटील यांनी सदर बातमीचा आशय पंच व पोलीस स्टाफला
समजावून सांगुन पोहवा शिरसाट , पोना लडकत , व पंच असे दिवळे गावचे हृदददीत जावुन सासवड ते कापूरहोळ रोडला सापळा रचुन थांबलो त्यावेळी सुमारे १३ : ४५ वा चे सुमारास सासवड बाजुकडुन एक सुझूकी कंपनीचा मिळाले बातमीप्रमाणे नंबरचा टेम्पो येत असताना दिसला त्यावेळी टेम्पो चालकास थांबविण्यास सांगितला तेव्हा चालकाने टेम्पो थांबविला त्यावेळी टेम्पोचे हौदयामध्ये काय आहे असे विचारले असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली तेव्हा त्यास ताब्यात घेवुन सदर टेम्पोचे हौदयाची पाहणी केली असता , सदर टेम्पोमध्ये देशी विदेशी दारूचे बॉक्स दिसले त्यावेळी आम्ही त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव रमेश रामचंद्र ढवळे वय ४७ धंदा हॉटेल व्यवसाय , रा . भेलकेवाडी , ता भोर , जि पुणे व आरोपी आपल्या ताब्यातील मारूती सुझुकीचा टेम्पो नं एम एच १२ एस एक्स ८९१९ यामध्ये देशी विदेशी कंपनीची दारू असा एकुण किंमत ६ लाख,३३६ रु चा माल विक्रीसाठी बेकायदेशीर विनापरवाना वाहतुक करीत असताना आढळून आले. गाडीसह मुद्देमाल जप्त करून आरोपीवर थेट पोलीस कारवाई करण्यात आली.आहे