पुणे,दि ३० :-‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत दिवाळी पहाट निमित्त ‘पहाट दिवाळीची ,यमन कल्याणची ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.१ नोव्हेंबर रोजी सकाळी ६. ३० वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे.‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.या कार्यक्रमांत ‘यमन ‘ या शास्त्रीय रागावर आधारित मराठी ,हिंदी गाणी सादर केली जाणार आहेत.
या कार्यक्रमात भारतीय विद्या भवन चा शिक्षकवृंद सादरीकरण करणार आहे . हा कार्यक्रम विनामूल्य आहे. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १०४ वा कार्यक्रम आहे.प्रवेश कोविड विषयक सर्व प्रोटोकॉल पाळून दिला जाईल .