पुणे,दि.१६ :- पुणे सह.ईतर ठिकाणी – 8 नोव्हेंबर 2021 पासून पुण्यातील रिक्षा भाडेपुणे सह.ईतर ठिकाणी – 8 नोव्हेंबर 2021 पासून पुण्यातील रिक्षा भाडेवाढ लागू होणार वाढ लागू होणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी यासंदर्भात पत्र काढले आहे. पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या हद्दीत तीन आसनी ऑटोरिक्षांच्या भाडेदरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पहिल्या दीड किलोमीटरसाठी पुढच्या महिन्यात 8 नोव्हेंबरपासून 20 रुपये, तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 13 रुपये भाडेदर लागू असणार आहे.सध्या पहिल्या दीड किलोमीटरसाठी 18 रुपये भाडे घेतले जाते, ते आता 20 रुपये असणार आहे. तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरला आता 12.19 पैसे घेतले जात होत, आता या दरात वाढ होऊन नवीन दरानुसार 13 रुपये घेण्यात येणार आहेत. पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काल (गुरुवारी) एक बैठक पार पडली. पुणे, पिंपरी चिंचवड आणि बारामती प्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थितीत होते. त्यामुळे आता पुणेकरांना डिझेल पेट्रोल गॅस नंतर आता ऑटो रिक्षावाढ दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे.
पुण्यासह पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत पुढच्या महिन्यात 8 नोव्हेंबरपासून ही दरवाढी लागू केली जाणार आहे. रात्री 12 ते सकाळी 5 या कालावधीत सुधारित दरावर 25 टक्के अतिरिक्त भाडे आकारले जाणार आहे. महानगरपालिका क्षेत्र वगळून इतर ग्रामीण भागात या रात्रीच्या कालावधीत 40 टक्के अतिरिक्त भाडे आकारले जाईल. प्रवाशांसोबत असणाऱ्या सामानासाठी 60 बाय 40 सेंमी आकाराच्या किंवा त्यापेक्षा अधिक मोठ्या नगासाठी 3 रुपये एवढे शुल्कही लागू करण्यात येणार आहे.दरम्यान लागू होणाऱ्या दरवाढीसाठी रिक्षांच्या मीटर कॅलिब्रेशन करण्यासाठी 8 नोव्हेंबरपासून 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मुदतीत मीटर कॅलिब्रेशन करून घेणाऱ्या रिक्षांनाच ही भाडे दरवाढ लागू असेल, अशी माहितीही देण्यात आली आहे.