श्रीगोंदा,दि०६ : -काल मढेवडगांव ग्रामपंचायतीच्या वतीने लसीकरण शिबीर आयोजित केले होते.मढेवडगांव येथील सामाजिक कार्यकर्त्या पूजा गणेश मांडे यांनी कोवीड १९ लसीचा दुसरा डोस घेतला असून त्यांनी मढेवडगांव येथील सर्व जनतेला लस घेण्याचे आव्हान केले आहे. तरी कोरोना या महाभयंकर आजारामुळे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात मानवजातीवर संकट आले आहे.तसेच मढेवडगांव येथे ७५टक्के लसीकरण झाले आहे.अशी माहिती के.जी.शेलार मॅडम यांनी दिली आहे.
मोठ्या प्रमाणावर व्यापारी अडचणीत आले असून देशाचे अर्थकारण संकटात आहे. हे संकट घालवायचे असेल किंवा कोरोना या आजाराला अटकाव आणायचा असेल तर लस घेणे गरजेचे आहे. हा उद्देश मनात ठेवून मढेवडगांव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध आहे.आरोग्याच्या दृष्टीने ही लस सुरक्षित आहे.मी घेतली आहे तुम्ही घ्या असे आवाहन श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगांव येथील नागरिकांना पूजा मांडे यांनी केले आहे. त्याचबरोबर करोनाला हरवायचे असेल तर शासनाचेही नियम पाळण्याचेही आवाहन देखील केले आहे.त्यामध्ये मास्क सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिगंचे पालन करणे, घरात रहा सुरक्षित रहा अवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असेही आवाहन त्यांनी यावेळी त्यांनी केले.यावेळी कामगार तलाठी जगताप.ए.एल, आरोग्य सेविका के.जी.शेलार,आरोग्य सेवक व्ही,जी,कांबळे,गाडे विमल,आशा सेविका धनक छाया,फरकांडे शकुंतला,बनकर सोनाली,रेवती खेतमाळीस,भारती भापकर, शुभम वाबळे, माऊली साळवे,मिठू गटणे, शुभम ससाणे आदी उपस्थित होते.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे