पुणे, दि.२९ :- दत्तनगर येथे एका सोनाराला इन्कम ट्रक्स अधिकारी असल्याचे भासवून एका सोनाराला तब्बल ३५ लाख रुपयांना लुटून पळून गेलेल्या ९ जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले आहे.याप्रकरणी नंदकिशोर कांतीलाल वर्मा (वय ४१, रा. वेंकटेश क्षितीज सोसायटी, दत्तनगर) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ ते २७ ऑगस्टच्या पहाटे दीड वाजण्याच्या दरम्यान घडला.वर्मा यांचा सोन्याची नथ बनविण्याचा व्यवसाय आहे. ते घरातच नथ बनवून सराफांना पुरवठा करतात. त्यांचा व्यवसाय वाढल्याने ते परिसरातील एक दुकान विकत घेण्याचा विचार करत होते. त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर पैसे असल्याचा आरोपींचा समज झाला. त्यानुसार त्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. व सोनाराला लुटण्याचा कट आखला. फिर्यादी व त्यांचे मित्र सोसायटीजवळ थांबले असताना गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पांढर्या रंगाच्या कारमधून आरोपी आले. त्यांनी फिर्यादी यांना आम्ही इन्कमटॅक्स अधिकारी असल्याचे सांगितले. तुम्ही टॅक्स भरत नाही. बेकायदेशीरपणे सोन्याचा व्यवसाय करता, सरकारची फसवणूक करता, तुमच्यावर इन्कम टॅक्सची रेड आहे, असे सांगितले. त्यामुळे फिर्यादी घाबरले. घरातील सर्व कागदपत्रे, कपाटे तपासण्याचा बहाणा केला. घरातील २० लाख रुपयांची रोकड आणि ३० तोळे सोने सील करण्यात आले. ते जप्त केले असे भासवले. त्यानंतर ते सर्व बरोबर घेतले.फिर्यादी यांनाही गाडीत बसवून पोलीस ठाण्यात जाण्याचा बहाणा केला.घरापासून निघाल्यावर त्यांना स्वामी नारायण मंदिरापर्यंत आणले.तेथे हत्याराचा धाक दाखवून त्यांना मारहाण करण्यात आली.त्यांच्या खिशातील ११ हजार २०० रुपये जबरदस्तीने काढले.त्यांना जीवे मारण्याचा धाक दाखवून गाडीतून उतरवले.
त्यानंतर ते ३० तोळे सोने, २० लाख रुपये असा ३५ लाख ११ हजार २०० रुपयांचा ऐवज घेऊन पळून गेले. या संपूर्ण प्रकाराने वर्मा हे घाबरुन गेले होते. त्यांनी दुसर्या दिवशी भारती विद्यापीठ पोलिसांना या घटनेची कल्पना दिली. पोलीस उपायुक्त सागर पाटील सहाय्यक आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींनी लुटलेला ऐवज देखील जप्त केला आहे. सदर गुन्हयात आरोपी व्यास गुलाब यादव , शाम अच्युत तोरमल , भैय्यासाहेब मोरे , किरणकुमार नायर व त्यांचे इतर साथीदार असल्याचे निष्पन्न झाल्याने संशयीत आरोपी भैय्यासाहेब मोरे याची माहीती कोल्हापुर परिसरात असल्याचे समजल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर व पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे व तपाथ पथकांचे पोलीस अंमलदार यांना कोल्हापुर येथे तपासाकामी पाठविले . पो.उप.नि. शिंदे व टीम यांना संशयित आरोपी हे मुरगुड पोलीस स्टेशन , कोल्हापुर या पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याची माहीती प्राप्त झाल्याने संशयित आरोपी यांच्या प्राप्त मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषण करुन सदर भागात आरोपी यांचा शोध घेत असताना आरोपी हे देवगड – निपाणी हायवेवर थांबले असल्याचे पोलिसांना दिसले. व पो.उप.नि शिंदे व टीम यांनी सदर ठिकाणी सापळा रचला परंतु त्याची चाहुल आरोपी यांना लागताच ते त्यांचे ताब्यातील इनोव्हा गाडीमधुन पळुन जावु लागले असता पो.उप.नि. शिंदे व टीम यांनी त्यांचेजवळ असलेल्या दुचाकी व चारचाकी यांच्या मदतीने शिताफीने पाठलाग करीत असताना ते इनोव्हा गाडी थांबवित नव्हते त्यामुळे पोलीस अंमलदार हर्षल शिंदे व शिवदत्त गायकवाड असे इनोव्हा गाडीला लटकले व पोलीस अंमलदार अभिजीत जाधव व विक्रम सावंत यांनी इनोव्हा गाडीच्या काचेवर जोरदार प्रहार केल्याने आरोपींनी त्यांची इनोव्हा गाडी थांबविली व आरोपींनी पो.उप.नि. शिंदे व टीम यांनी ताब्यात घेतले असता इनोव्हा गाडीमध्ये १ ) मैय्यासाहेब विठठल मोरे २ ) किरण कुमार नायर ३ ) मारुती अशोकराव सोळंके ४ ) ऊमेश अरुण ऊबाळे ५ ) अशोक जगन्नाथ सावंत ६ ) सुहास सुरेश थोरात असे एकुण ६ जण मिळुन आले . सदर आरोपींना त्यांनी गुन्हयात वापरलेल्या इनोव्हा गाडी नंबर एमएच .० ९ बी.एम.७७७१ सह ताब्यात घेवुन मुरगुड पोलीस स्टेशन येथे आणुन आरोपी भैय्यासाहेब विठठल मोरे याचेकडे तपास केला असता त्यांनी १ ) व्यास गुलाब यादव , वय ३४ वर्षे , रा . साईवॉटर क्रिस्ट सोसायटी , बि . नंबर ए , फलॅट नंबर ६०४ , जांभुळवाडी रोड , मोडक वस्ती , आंबेगाव खुर्द , पुणे मुळ गाव – मु . पो . बिशनपुर , ठाणा – मोफसील , ता . सरसर , जि . सिवान , बिहार २ ) शाम अच्युत तोरमल , वय ३१ वर्षे रा . पांडुरग निवास , लेन नंबर ४ , सर्वे नंबर ७ , राजमुद्रा सोसायटी , धनकवडी , पुणे यांच्या प्लॅनप्रमाणे १ ) किरण कुमार नायर , वय ३१ वर्षे रा . गव्हाने वस्ती , कुमार निवास , नलावडे चाळ , भोसरी २ ) मारुती अशोकराव सोळंके , वय ३० वर्षे रा . फुलेनगर , ता . माजलगाव , जि.बिड ६ ) ऊमेश अरुन ऊबाळे , वय २४ वर्षे , रा . गणपती मंदिरा शेजारी , गव्हाने वस्ती , भोसरी ३ ) अशोक जगन्नाथ सावंत , वय ३१ वर्षे , रा . शिवाजीनगर , बजाज पेट्रोल पंपा शेजारी , माजलगाव , बीड ४ ) सुहास सुरेश थोरात , वय ३२ वर्षे रा . आकुर्डी , दत्तवाडी , पुणे मुळ गाव कारवे , ता . कराड , जि . सातारा ५ ) रोहीत संभाजी पाटील , वय २३ वर्षे रा.सध्या- फ्लॅट नं . ५०२. सी विंग , रिध्दी सिध्दी टॉवर्स , चहोली फाट्याजवळ , चहोली , पुणे . मुळ पत्ता . मु . पो . सरवडे , ता . राधानगरी जि . कोल्हापुर यांच्या मदतीने गुन्हा केला असल्याचे कबुल केल्याने व गुन्ह्यातील लुटलेला मुद्देमाल हा पुण्यामध्ये असणाया रोहीत संभाजी पाटील , वय २३ वर्षे रा.सध्या- फ्लॅट नं . ५०२ , सी विंग , रिध्दी सिध्दी टॉवर्स , चहोली फाट्याजवळ , चहोली , पुणे याचेकडे असल्याची माहीती दिली . लागलीच पो.उप.नि. शिंदे यांनी सदरची माहीती पो.उप.नि. कर्वे यांना कळविली असता पो.उप.नि. कर्चे व टीम यांनी रोहीत संभाजी पाटील यास चहोली , आळंदी रोड , पुणे येथुन ताव्यात त्यांचेकडे कसुन चौकशी केली असता त्यांने मुद्देमाल एका ठिकाणी लपवुन ठेवल्याची माहीती दिली .व पो.उप.नि. कर्चे व टीम यांनी सदरचा मुद्देमाल हा आरोपीच्या ताब्यातुन जप्त करुन सदर गुन्हा उघडकीस आणला आहे.तसेच त्याचेकडून ३३ लाख,२८ हजार.५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे . तसेच कोल्हापुर येथुन ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता ताब्यातील आरोपीपैकी मारुती अशोकराव सोळंके , वय ३० वर्षे रा . फुलेनगर , ता . माजलगाव , जि.बीड व अशोक जगन्नाथ सावंत , वय ३१ वर्षे , रा . शिवाजीनगर , बजाज पेट्रोल पंपा शेजारी , माजलगाव , बीड हे माजलगाव पोलीस स्टेशन फरारी आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे . सदरची कामगिरी पोलीस आयुक्त , अमिताभ गुप्ता , पोलीस सह आयुक्त डॉ रविंद्र शिसवें , अपर पोलीस आयुक्त , डॉ . राजेंद्र डहाळे , पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०२ , पुणे शहर सागर पाटील , सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती सुषमा चव्हाण , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , जगन्नाथ कळसकर , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) . श्रीमती संगिता यादव , पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे , अंकुश कर्चे पोलीस उप निरीक्षक अंकुश कर्चे , अंमलदार रविन्द्र भोसले , रविंद्र चिप्पा , गणेश सुतार , सचिन पवार , निलेश खोमणे , योगेश सुळ , हर्षल शिंदे , अभिजीत जाधव , गणेश शेंडे , राहूल तांबे , धनाजी धोत्रे . नवनाथ खताळ , सचिन गाडे , आशिष गायकवाड , विक्रम सावंत , जगदीश खेडकर व शिवदत्त गायकवाड , विजय कुंभारकर व मंगेश बोरडे यांनी केली आहे .