कर्जत,दि.०६ :–तालुक्यातील चोरीचे प्रमाण हे काही दिवसामध्ये वाढत चालल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे कर्जत करांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील चोरीचे उदाहरण ताजे असतानाच आज जलालपूर येथे दोन ठिकाणी मॅरेथॉन पध्दतीने चोरी झाल्याचे उघड झाले आहे.प्रथम चोरी ही जलालपूर येथील बोराटे वस्ती येथे रमेश भागूजी बोराटे यांच्या घरी दुपारी चारच्या आस पास चोरी झाली.चोरी करणा-या चोरांनी कपाट फोडून महत्वाचे कागद पञ,दोन ते तीन तोळे सोने तसेच सात हजार रुपये रोकड रक्कम चोरट्यांनी लंपास केली.तर
दुसरी चोरी ही पहिली चोरी च्या ३किलो मीटर अंतरावर खेडकर वस्ती येथील रहिवासी बाबू रामा राऊत यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटाचे लाॅक जोरात प्रहार देऊन तोडले आहे.त्या मधील तीन तोळे सोने तसेच पंधरा हजार रुपये रोकड रक्कम त्या ठिकाणाहून चोरांनी चोरून धुम ठोकली आहे.या वेळी जलालपूर गावचे पोलीस पाटील आण्णा सांगळे तसेच राशीन बीटचे पोलिस हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे तसेच शिंदे यांनी पाहणी करूणपुढील तपास करत आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे