पुणे, दि. २२:- पुणे शहर पोलिस आयुक्तालयात नव्याने समावेश झालेल्या लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार ऋषिकेश सुरेश पवार (वय 23, रा. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर) याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश पारित केले आहे.ऋषिकेश पवार हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गावठी पिस्तुल, कोयता, सुरा, लोखंडी पाइप, बेसबॉलची बॅट यासारखी जीवघेणी हत्यारे जवळ बाळगून खुनाचा प्रयत्न, दरोड्याचा प्रयत्न, दंगा, दुखापत, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत.2017 पासून त्याच्याविरोधात सहा गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या गुन्हेगारी स्वरूपाच्या पार्श्वभूमीमुळे सार्वजनिक व्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भीतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.ऋषिकेश पवार यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी त्याला एमपीडीए कायद्यानुसार स्थानाबद्दल करण्याचा प्रस्ताव तयार करून पोलीस आयुक्त अनिता गुप्ता यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार पोलिस आयुक्तांनी या प्रस्तावाची पडताळणी करून एक वर्षासाठी त्याला स्थानबध्द करण्याचे आदेश पारित केले आहेत.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहरातील सक्रिय आणि दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यानुसार मागील नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये 31 गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्ध केले आहे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,राजेंद्र मोकाशी व पोलीस उप – निरीक्षक. अमित गोर , लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर . यांनी एमपीडीए कायदयान्वये नमुद इसमास स्थानबध्द करण्याकामी प्रस्ताव तयार करुन .पोलीस आयुक्त , पुणे शहर . यांचेकडे सादर केला होता.अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त , पुणे शहर . यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन नमुद इसमाचे विरुध्द दि .१९ / ०७ / २०२१ रोजी एमपीडीए कायदयान्वये एक वर्षाकरीता ०१ गुन्हेगारास स्थानबध्दचे आदेश पारीत केले आहे.अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त , पुणे शहर यांनी सक्रिय व दहशत निर्माण करणा – या अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे.त्यानुसार मागील ० ९ महिन्याच्या कालावधी मध्ये ३१ गुन्हेगारांना एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द केले आहे . यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी या प्रमाणे कारवाई करण्याचे ठरविले आहे