पुणे दि १९ :- पुणे शहर पोलिसानची सर्वात मोठी कारवाई लोणीकाळभोर,व उरुळी कांचन भागात जुगाराची ‘डबल’ कारवाई झाल्याने प्रचंड खळबळ उडाली असून, पुणे शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीन पत्त्याच्या खेळाचा ‘क्लब’ अन ‘मटक्या’वर छापा मारत तबल 72 लोकांवर एकाचवेळी कारवाई केली आहे. क्लबवरील छाप्यात दीड लाखांची रोकडसह अडीच लाखांचा माल जप्त केला आहे. तर युनिट सहाने मटक्यावर छापा कारवाई करत 12 व्यक्तींना पकडले आहे. या कारवाईने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे शहर .लोणीकाळभोर परिसर ‘ या कारवाई वरून समोर आले आहे. पुण्याच्या गुन्हे शाखेच्या कारवाईमूळे दोन नंबर करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आला आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन भागात संजय बडेकर याचा खेडकर मळा येथील एका हॉटेल शेजारी जुगार सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहिती खातरजमा करण्यात आली. त्यानंतर मध्यरात्री उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी स्वत: पथकाबरोबर जाऊन याठिकाणी छापा टाकला. यावेळी येथे ‘रम्मी’चा खेळ सुरू होता. पोलिसांनी या सर्वांना पकडत चौकशी सुरू केली. यावेळी येथून 1 लाख 48 हजार रुपयांची रोकड आणि इतर साहित्य असा अडीच लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. बडेकर याच्या क्लबला अनिल कांचन, अतुल उर्फ आप्पा कांचन व योगेश उर्फ बाळा कांचन हे चार पार्टनर असल्याचे सांगण्यात आले आहे. तर याठिकाणी तबल 15 कामगार देखील होते.ही कारवाई सुरू असतानाच युनिट सहाच्या पथकानेही काही अंतरावर सुरू असलेल्या मटका जुगारावर छापा टाकला आहे. येथून 12 व्यक्तींना पकडण्यात आले आहे.हा मटका मंगेश कुलकर्णी या व्यक्तीचा असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.येथून 92 हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे.दोन्ही कारवाया एकत्र व एकाच वेळी झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शहरात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हंटले जात आहे.कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे,
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, दरोडा व वाहन चोरी पथकाच्या पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने आणि त्यांच्या पथकाने मध्यरात्री केली आहे.लोणीकाळभोर पोलीस स्टेशनची हद्द पूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांकडे होती. अलीकडील काळात लोणीकाळभोर पोलीस स्टेशनची हद्द पुणे पोलीस आयुक्तालयात समाविष्ट करण्यात आली आहे.पोलीस आयुक्तांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचा आदेश दिल्यानंतर देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणाच्या आशिर्वादाने पत्त्याचा क्लब आणि मटका अड्डा चालू होता हा सर्वात मोठा प्रश्न आहे.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता याची सखोल माहिती घेऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करणार का याकडे संपूर्ण पुणे पोलीस दलाचे लक्ष लागले आहे.दरम्यान, लोणीकाळभोर मध्ये ‘ या कारवाई वरून उघड झाले आहे.लोणीकाळभोरच्या हद्दीत क्लब आणि मटका चालविणारे अवैध धंद्यावर कृपादृष्टी ठेवणाऱ्या संबंधिताला महिन्याकाठी मोठा मलिदा देत असल्याची चर्चा देखील आहे.याची देखील माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता घेणार का? हा देखील मोठा प्रश्न आहे.
संबंधित अवैध धंद्यावरून काही दिग्गज कर्मचारी काही अधिकाऱ्यांसाठी महिन्याकाठी मोठी रक्कम घेत होते अशी आता चर्चा सुरू झाली आहे.’या बाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.