पुणे दि १९ :- पुणे शहरात जबरी चोऱ्या करणाऱ्या दोघांवर पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कारवाई करत या दोघांची रवानगी पुणे येरवडा कारागृहात केली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आतापर्यंत वेगवेगळया गुन्हेगारांवर 36 वेळा मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत रेकॉर्ड वरील गुन्हेगार नामे दत्तात्रय हनुमंत अलगुडे वय- २८ वर्षे , रा . हॉटेल श्री गणेश जवळील लेन , शिवाजीनगर रेल्वे स्टेशन , पुणे व अविनाश ऊर्फ तम्म्या राजु शेट्टी वय- २१ वर्ष , रा . वडारवाडी , गोलंदाज चौक ,शिवाजीनगर रेल्वे स्टेशन लेन अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.दोघे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.यावेळी चतुःर्श्रुंगी पोलीस स्टेशन हद्दीतील बाणेर येथे बँकेत पैसे भरण्यास जात असलेल्या तरूणाला अडवून त्याला माझ्या बहिणीच्या अंगावर गांजा फुंकला असे म्हणत शिवीगाळ करून 34 हजार लुटून नेले होते. याप्रकरणी चतुःर्श्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.यावेळी गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने शोध घेऊन या दोघांना अटक केली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शोभा क्षीरसागर, संदीप जमदाडे, उपनिरीक्षक जयदीप पाटील व त्यांच्या पथकाने या दोघांवर मोक्का कारवाई करावी.असा प्रस्ताव तयार करून तो अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे आणि उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांना पाठवला होता.
त्याची चौकशी व छाननीकरून दोघावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या दोघांवर मोक्का कारवाई केली आहे.पुढील तपास. मच्छींद्र चव्हाण , सहाय्यक पोलीस आयुक्त , आस्थापना , पुणे शहर हे करित आहेत . सदरची कारवाई ही . पोलीस आयुक्त . अमिताभ गुप्ता ,पोलीस सह आयुक्त डॉ . रविंद्र शिसवे ,अपर पोलीस आयुक्त , अशोक मोराळे , पोलीस उप आयुक्त . श्रीनिवास घाडगे , सहा पोलीस आयुक्त गुन्हे -२ लक्ष्मण बोराटे , पोलीस निरीक्षक . सुनिल पंधरकर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि शोभा क्षीरसागर , सपोनि संदिप जमदाडे , पोउपनि जयदीप पाटील , पोलीस अंमलदार महेंद्र पवार , रुपेश वाघमारे , दत्तात्रय फुलसुंदर , रमेश राठोड , गणेश साळुके , राजस शेख , दिपक भुजबळ , नागेश कुंवर , विशाल शिर्के , राकेश खुणवे , कौस्तुभ जाधव , स्वप्निल कांबळे , सुरेंद्र साबळे , अशोक शेलार , सागर वाघमारे , शितल शिंदे यांनी केली आहे .पोलीस आयुक्त , पुणे शहर अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचाली वर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत . त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही ३६ वी कारवाई आहे .