मुंबई दि २५ :- नालासोपारा येथील आचोळे डोंगरी परिसरात राहणाऱ्या संदीप साहू याने आपल्या राहत्या घरात हातोडी, धारधार चाकू आणि स्टीलच्या झारा यांच्या साहाय्याने डोक्यावर, पाठीवर घणाघाती घाव घालून आपलाच मित्र राहुल याची निर्घृण हत्या केली.तुळींज पोलिसांनी आरोपी संदीप साहू यास अटक केली असून प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे, मयत राहुल हा आरोपीच्याच घरात राहायला असून त्याचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत असा संशय संदीपच्या मनात घर करून होता, संशयाचे भूत त्याच्या मनात इतके थैमान घालू लागले की या सर्वांचा आता कुठे तरी शेवट करावाच लागेल अशी गाठ त्याने मनात बांधली व दुपारी अडीचच्या सुमारास कोणताही विचार न करता घरातीलच हातोडी, चाकू, स्टीलचा झाऱ्याने वार करून राहुल याची निर्घृण हत्या केली व तुळींज पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास तुळींज करत आहे.
मुंबई आलीबाग प्रतिनिधी :- प्रवीण रा. रसाळ