पुणे दि १५ :- सद्या कोरोनामुळे भयभीत वातावरण आहे. अशा परिस्थितीत पुणे शहरातील चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस चौकी व ट्रॅफिक पोलीस स्टेशन येथील पोलिस बांधव सुरक्षित असावा असे लक्षात घेऊन आज दि १५ रोजी मा.नगरसेवक सनी निम्हण यांनी “सॅनिटाईझ विथ सनी” हे अभियान गेल्या काही दिवसांपासून चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन
हद्दीतील पोलीस बांधव व नागरिकांसाठी राबविले आहे. सनी निम्हण यांनी आतापर्यंत आपल्या परीसरातील संकल्पनेतून नागरिकांसाठी सोसायटी परिसरात सिक्युरिटी व गरजू लोकांना मास्क वाटप व सॅनिटायझर , तसेच वेगवेगळ्या योजना राबविल्या आहेत.सॅनिटाईझ विथ सनी’ अभियानाअंतर्गत नागरीकांच्या मागणी नुसार म.न.पा हॉस्पीटल, भाजी मंडई,सार्वजनिक स्वच्छतागृह, व ईतर ठिकाणी फवारणी करण्यात आली. त्यावेळी झुंजार न्यूज चॅनेल चे सामाजिक व राजकीय प्रतिनिधी. संकेत संतोष काळे यांनी पाहणी केली
असताना त्या वेळी पोलिस बांधव व नागरिकांसोबत बोलताना नागरिकांनी व पोलीस बांधव यांनी भरभरून कौतुक उपक्रमाचे केले आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना गणेश गरुड सेनीटाईज करत असताना त्यांनीही सांगितले कि नागरिकांच्या उत्कृष्ट प्रतिसादामुळेे मलाही काम करण्याची इच्छा होत आहे व सनी निम्हण यांनी सांगितले की, नागरीकांना सुरक्षीत राहावे व घरी राहवे व परिसर निर्जंतुक करण्यासाठी फवारणी करत आहोत. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्य सुरक्षीत राहण्यास मदत होईल. त्यांनी नागरीकांना आव्हान केले की, “सॅनिटाईझ विथ सनी” अभियानाचा लाभ घेण्यासाठी व आपला परिसर सुरक्षित करण्यासाठी आम्हाला 8308123555 या नंबर वर संपर्क करावा.
सामाजिक व राजकीय प्रतिनिधी:- संकेत संतोष काळे