पुणे दि १५ : -पुणे जिल्ह्यात कोरोणा चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या वतीने काही कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद आहे. त्यामुळे अनेकांची रोजी रोटी बंद झाल्याने उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कठीण काळात श्री शनि मारुती बाल गणेश मंडळ ट्रस्ट कडून गरजूंना जेवण देण्यात येत आहे.
ट्रस्ट च्या माध्यमातून गेली सात दिवसापासून हे कार्य अविरत सुरू आहे. आत्तापर्यंत 2200 गोरगरीब, बेघर लोकांना शहराच्या विविध भागात जाऊन जेवण देण्यात येत आहे. श्री शनी मारुती बाल गणेश मंडळ ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष दिपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकाऱ्यांच्या मदतीने शहरातील गरजूंना अन्नदान करण्यात येत आहे. येथील शनी मंदिराजवळ अन्न शिजविण्यासाठी कार्य अविरत सुरू आहे.
दररोज कर्वे नगर, वारजे, चांदणी चौक, सिंहगड रोड, शिवणे, कोथरूड, डीपी रोड, स्वारगेट, अलका टॉकीज, मनपा ब्रिज शहरातील आदी भागात फिरून अन्नदान करीत आहेत. त्यामध्ये व्हेज बिर्याणी, अंडा बिर्याणी, अक्षय तृतीया निमित्त अमृस पुरी, चपाती भाजी इत्यादीचा समावेश आहे.
या कार्यासाठी सचिन पवार, गणेश शेलार, प्रवीण पेंढारे, सूरज जाधव, पंकज पेंढारे, आकाश पाडेकर, दीपक साकोरे, सुनील तेलंग आदींनी परिश्रम घेतले.