पुणे दि १५ : – पुणे शहरातील बाणेर येथील म्हाळुगे रोड , वर्षा गार्डन जवळ , बाणेर , जगदंबा ट्रेडर्स दुकान , अज्ञात चोरट्यांनी फोडले आहे. याप्रकरणी ईश्वर राम , वय २३ वर्षे , रा . बाणेर , पुणे यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे बाणेर येथील म्हाळुगे रोड , वर्षा गार्डन जवळ , बाणेर , जगदंबा ट्रेडर्स दुकान आहे. दिनांक १४/ ०५/२०२१ रोजी पहाटे ०३.३० वा . चे यादरम्यान या अज्ञात तीन इसमांनी दुकानाचे शटर उचकटुन आत प्रवेश केला. तसेच रोकड 10 हजार रुपये चोरून नेला आहे. पुढील तपास पो.सहा.निरी.विशाल पवार करत आहे