श्रीगोंदा दि ०९ :- कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या संकटात श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगांव येथील उद्योजकाने मानवतेच्या दृष्टीकोनातून देवदैठण येथील पद्मभुषण आण्णासाहेब हजारे कोव्हिड आरोग्य मंदिरासाठी स्वयंप्रेरणेने १० हजार रुपयांचा निधी संकलित करून आदर्शवत कार्य केले आहे.तसेच श्री सिद्धेश्वर कोविड सेंटर लिंपणगाव येथे सदिच्छा भेट देऊन १० हजार रुपये रोख स्वरूपात मदत दिली.मी फक्त प्रसिध्दीसाठीची पळापळ करत नसून अनेकांनी यातून प्रेरणा घेण्याची गरज आहे.असे उद्योजक दिनेशकुमार (अंबादास)गायकवाड यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितले. संकटकाळी सर्वसामान्यांसाठी जो धावतो तोच खरा समाजाचा तारणहार असतो. कोरोना रुग्णांना दिलासा देण्यासाठी उद्योजक दिनेशकुमार (अंबादास)गायकवाड यांची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद व स्तुत्य असल्याचे कौतुक पंचायत समिती सदस्यपती अतुलशेठ लोखंडे यांनी व्यक्त केले आहे. श्रीगोंदा तालुक्यात रुग्ण संख्या वाढत असताना गोरगरिब रुग्णांना व गंभीर रुग्णांना देवदैठण येथील पद्मभुषण आण्णासाहेब हजारे कोव्हिड आरोग्य सेंटरमध्ये उपचार दिले जात आहेत.
कोरोना संकटात सामाजिक बांधिलकीच्या भावनेने व स्वेच्छेने सामाजिक उत्तरदायित्व निभावत दिनेशकुमार
(अंबादास)गायकवाड यांनी कोव्हिड सेंटरसाठी मदत जमा करून आदर्शवत काम केले आहे. या पवित्र कार्याला अनेक मदतीचे हात पुढे येत आहे.अनेक सामान्य नागरीकांच्या संकटात अतुल लोखंडे नेहमीच धावून गेल्याने आता त्यांनी सेवाभावी वृत्तीने सामान्य रूग्णांसाठी सुरू केलेल्या या आरोग्य मंदीरासाठी असे अनेक लोक शक्य ती मदत देउन उतराई होण्याचा प्रयत्न करीत आहे. यावेळी युवा उद्योजक प्रमोद शिंदे,सरपंच उदयसिंह जंगले पाटील,अरविंद आबा कुरूमकर उपसरपंच, नीलकंठ जंगले, सुदाम पवार,संतोष चव्हाण, विशाल कुरूमकर, किरण कुरूमकर,संदीप घावटे सर,बाळासाहेब कौठाळे,मनेश निघुल,आप्पासाहेब गुंजाळ,प्रतिक वाघमारे,सुयोग गायकवाड यांचेकडे सुपूर्द केले.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे