पुणे दि ०५ :- संचारबंदी आणि निर्बंधांच्या फटक्याने झालेले नुकसान सावरण्यासाठी प्रयोग कोरोना, लॉकडाउनमुळे पर्यटन व्यवसाय अडचणीत आहे. या क्षेत्राची राज्यातील दरमहा होणारी अंदाजे दीड ते दोन हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन व्यावसायिक घटकांचा सर्व्हे सुरू केला आहे. पर्यटन व्यवसाय सावरण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवता येतील, नुकसान भरून काढण्यासाठी काय करावे लागेल, पर्यटन धोरण काय ठरवावे लागेल यासाठी सर्व्हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
वर्षभरात विमान बंद असल्याने विदेशी पर्यटक आलेले नाहीत. रेल्वे बंदमुळे देशांर्तगत पर्यटन ठप्प आहे.स्थानिक पातळीवरील लॉकडाउनमुळे प्रवासी वाहतूक थांबली आहे. यामुळे लॉजिंग , रेस्टॉरंट , प्रेक्षणीय स्थाळांकडे पर्यटक फिरकलेच नाहीत. पर्यटनावर आधारित व्यापारही ठप्प आहे. पर्यटनस्थळे असलेल्या शहरी भागातील किंवा गावातील बाजारपेठाही ओस पडल्या. यामुळे होणारी सुमारे दीड ते दोन हजार कोटींची उलाढाल थंडावली.
खालील बाबींचा सर्वेक्षणात समावेश –
हॉटेल व्यवसायिक, रेस्टॉरंट, यात्री निवास, निवास न्याहारी योजना, कृषी पर्यटन केंद्र, निसर्ग पर्यटन केंद्र, वॉटर पार्क, टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स कंपन्या एजंट, वाहतूकदार कंपन्या, बोटिंग क्लब, पर्यटन खेळ सुविधा पुरवठादार, गाईड, स्टॉल्सधारक हे प्रमुख घटक केंद्रस्थानी आहेत.
“पर्यटन व्यवसाय सावरण्यासाठी ऑनलाईन सर्व्हे होत आहे. त्याची लिंक एमटीडीसीने पर्यटक, त्यावर अवलंबून असलेला व्यवसाय, पर्यटकांची वार्षिक संख्या, त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, नुकसानीचे स्वरूप, कामगार संख्या आणि अवलंबत्व असलेले घटक यास अनुसरून या सर्व्हेत प्रश्नावली आहे. –
दिपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे.
संचारबंदी आणि निर्बंधांमुळे अनेकांचा रोजगार बुडाला. त्यातून जगण्याचे गंभीर प्रश्ना निर्माण होत आहेत. अशा स्थिआतीत पर्यटन व्यवसायास किती लोक जोडले आहेत, त्यापैकी कोणाचे किती नुकसान झाले, असा आजवर सर्व्हे कधीही झालेला नाही. त्यामुळे या व्यवसायाला सावरण्यासाठी उपाययोजनाच आखता आलेल्या नव्हत्या. या पार्श्वभुमीवर संचारबंदी आणि निर्बंधांमुळे झालेले नुकसान आणि पर्यटन क्षेत्र सावरण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाय योजना यासाठी हा सर्व्हे होत आहे. सदरच्या सर्व्हेची लिंक खालीलप्रमाणे आहे.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScZgZy3jnWplAiZgjkB1DKy9LtJfczhAbEAQ2OmkV-C7h96eQ/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0