कर्जत दि २१ : – कुळधरण रोड कर्जत आणि राशीन येथील किराणा दुकान फोडणाऱ्या चोरट्याचा माग काढण्यात कर्जत पाेलिसांना यश आले आहे. त्यांनी बारडगांव दगडी ता.कर्जत येथून एका आरोपीला जेरबंद केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.२८/०३/२०२१ रोजी कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.फिर्यादी अविनाश संजय राऊत वय २७ वर्ष, धंदा किराणा दुकान, रा. गुंड वस्ती, कर्जत ता.कर्जत यांचे किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले होते.किराणा दुकानातील आठ हजार रुपये किमतीचे तेलाचे डबे व एक १५०० रुपये किमतीचे ३० किलो इंद्रायणी तांदूळ कट्टा व २००० रुपयांची चिल्लर असा एकूण ११५०० रुपयाचा माल चोरून नेला होता. तसेच कारखाना रोड,राशीन येथील किराणा मालाचे शटर उचकटून सुद्धा २ लाख रु.किंमतीचा किराणा माल चोरून नेला होता.या घटनेची तक्रार कर्जत पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. दुकान फोडीतील आरोपी बारडगांव दगडी ता.कर्जत येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वात तपास पथक गठित करून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील अंकुश ढवळे, पोलीस जवान पांडुरंग भांडवलकर, सुनील खैरे, शाम जाधव, भाऊ काळे, सुनील म्हेत्रे, देवा पळसे यांची एक टीम बारडगांव दगडी ता.कर्जत येथे गेली. त्यानंतर सतीश जेवढ्या उर्फ देविदास काळे, वय २९ वर्ष, राहणार बारडगाव दगडी, तालुका कर्जत यास अटक करण्यात आली आहे.पुढील अधिक तपास पोलीस हवालदार सलिम शेख करत आहेत.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे