पुणे दि २८ :- पुणे शहरात दरवर्षी होणारा मोफत वधू वर मेळावा श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूड पुणे आयोजित, वधू-वर पालक परिचय मेळावा रविवार दिनांक ४ एप्रिल २०२१ रोजी होणार होता .परंतू कोरोणाच्या प्रादुर्भाव आणि शासनाच्या आदेशानुसार, समाजबांधवांच्या आरोग्याचा विचार करता ,सदर मेळावा रद्द करून, फक्त पुस्तक प्रकाशनाचा निर्णय मेळावा कमिटीने घेतला असून ,पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम 13 एप्रिल गुढीपाडवा या दिवशी घेण्यात येणार आहे. तरी सर्व वधु वर पालकांना व इतर समाज बांधवांना सुचित करण्यात येते ,की कोणीही चार एप्रिल रोजी मेळाव्यासाठी येण्याचा प्रयत्न करू नये .कारण मिळावा रद्द झालेला आहे आपले व इतरांचे आरोग्य धोक्यात घालू नये. सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे .असे आवाहन, श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूड पुणे च्या वतीने करण्यात येत आहे. धन्यवाद !
सदैव आपलेच
श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूड पुणे