श्रीगोंदा दि २६ :–घरफोड्या, चोरी,दरोडा असे गंभीर गुन्हे करणाऱ्या अट्टल सराईत गुन्हेगाराला श्रीगोंदा पोलीसांच्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान १लाख रुपये किमतीच्या दोन मोटारसायकलसह जप्त करण्यात आल्या असून श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक केली आहे.
बाबुश्या चिंगळ्या काळे वय 21 वर्ष रा.वांगदरी, ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर असे या अटक केलेल्या रेकॉर्डवरिल सराईत अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.२३ मार्च रोजी रात्री ११ ते दि.२४ रोजी पहाटे ५ च्या दरम्यान श्रीगोंदा पोलिस स्टेशनच्या वतीने पोलिस पथकासह कोबींग ऑपरेशन काष्टी,वांगदरी ,मढेवडगाव परिसरात केले असता बाबुश्या चिंगळ्या काळे वय २१ वर्ष हा वांगदरी शिवारात आढळून आला असता त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने शिरुर पो.स्टे जिल्हा पुणे येथुन मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली.सदर बाबत शिरुर पो.स्टे गु.र.न. ६४/२०२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.एक चोरीची सी.डी डिलक्स मोटार सायकलसह मिळून आली. त्याचेकडे अधिक विचारपूस केली असता त्याने खेड पोलिस स्टेशन पुणे ग्रामिण गुरनं १३७/२०२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा केल्याची कबुली दिली व सदर गुन्हातील चोरी केलेली बुलेट मोटार सायकल काढून दिल्याने तीही जप्त करण्यात आली असून आरोपीकडुन आता पर्यत दोन मोटार सायकली असा एकुन १लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. तसेच त्याचेवर खेड, यवत,शिरूर, श्रीगोंदा आदी ठिकाणी ७ विविध प्रकारचे तसेच यापुर्वी मालाविरुध्दचे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, ,सपोनि दिलीप तेजनकर, पो.हे.कॉ.अंकुश ढवळे ,पो.हे.कॉ.मनोहर गावडे ,पो.कॉ. प्रकाश मांडगे,पो.कॉ गोकुळ इंगावले,पो.कॉ किरण बोराडे,पो.कॉ दादा टाके, पो.कॉ सचिन म्हस्के यांनी केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे