पुणे दि ०६ :- चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन येथे एका फिर्यादी महिलाने वय ६८ वर्षे , रा.पाषाण पुणे यांचे नावे मौजे पर्वती सहकारनगर सर्व्ह नं .८७ / १ / १ या मध्ये ४ एकर ९ आर मिळकतीचा व्यवहार करुन परस्पर ऋषिकेश बारटक्के यांचेकडुन ७० लाख रुपये घेवुन फसवणुक व विश्वासघात करुन सदरची मिळकत बळकावण्याच्या उद्देशाने महसुल दप्तरी हरकती घेवुन जमिनीच्या व्यवहारात तडजोडीसाठी ३ कोटी रुपयांची मागणी करुन वेळोवेळी धमकी देवुन कटकारस्थान रचुन फिर्यादी व त्यांचे कुटुंबीयांची तसेच फिर्यादी यांनी सदर मिळकतीचा व्यवहार ऋषिकेश बारटक्के यांचे सोबत केल्याने त्यांचीही प्रसार माध्यमातुन प्रेस कॉन्फरन्स व इतर माध्यमातुन बदनामी करुन राहते घरी हस्तक पाठवुन जमिन बळकावण्याचे उद्देशाने वेळोवेळी धमक्या देवुन तसेच खोटे गुन्हे दाखल करुन आयुष्यभर जेलमध्ये सडवण्याची धमकी दिल्याने फिर्यादी यांनी टोळी प्रमुख आरोपी नामे १ ) रविंद्र लक्ष्मण बहाटे.रा – फ्लॅट नंबर १०० , मधुसुदन अपार्टमेंट , लुल्लानगर , बिबवेवाडी , पुणे व धनकवडी , पुणे २ ) शैलेश हरिभाऊ जगताप , रा – बिल्डींग नंबर ०२ , रूम नंबर १२ , सोमवार पेठ , पोलीस लाईन , पुणे .३ ) परवेझ शब्बीर जमादार , रा – बिल्डींग नंबर ०७ , रूम नंबर ३१ , सोमवार पेठ पोलीस लाईन , पुणे ४ ) देवेंद्र फुलचंद जैन , प्रियदर्शनी सोसायटी , सिंहगड रोड , पुणे ५ ) प्रशांत पुरुषोत्तम जोशी , वय ३६ वर्षे , रा . फ्लॅट नंबर १२ , १ ए , कृष्णलिला हौसिंग सोसायटी , कोथरुड , पुणे .६ ) प्रकाश रघुनाथ फाले वय -४१ वर्ष , रा – कल्पवृक्ष बिल्डींग , हिरकणी सोसायटी , जुनी सांगवी , पुणे ७ ) विशाल गजानन तोत्रे , वय ३६ वर्षे , रा . ए / १८ पोलीस वसाहत , मॉर्डन कॉलेज शेजारी , शिवाजीनगर , पुणे ८ ) संजय प्रल्हाद भोकरे , वय -५८ वर्ष , रा – धनंजय सोसा . सिध्दीविनायक रेसिडेन्सी , फलॅट नं .४ , कोथरुड पुणे -३८ व इतर आरोपी यांचे विरुध्द चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता . टोळी प्रमुख रविंद्र लक्ष्मण बहाटे याने टोळी मधील इतर टोळी सदस्यांना बरोबर घेवुन टोळी प्रमुख याचे सांगणे प्रमाणे यातील टोळी सदस्य काम करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुध्द दाखल गुन्हे मोक्का अंतर्गत कारवाई करणेबाबतचा प्रस्ताव रमेश गलांडे , सहायक पोलीस आयुक्त , खडकी विभाग , पुणे शहर यांनी.पंकज देशमुख , पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ , पुणे शहर यांचे मार्फत.नामदेव चव्हाण , पोलीस उप महानिरीक्षक तथा अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर यांना सादर केला होता.सदर प्रस्तावाची छानणी केल्यानंतर गुन्ह्यातील टोळी प्रमुख रविंद्र लक्ष्मण बहाटे याचे टोळीतील वर नमुद केलेले आरोपीत इसम टोळी सदस्य म्हणुन काम करत असल्याचे निष्पन्न झाले आहे . टोळी प्रमुख रविंद्र लक्ष्मण बहाटे व त्याचे वर नमुद केलेले टोळी सदस्य यांनी संघटीतरित्या प्रस्तुत गुन्हा केलेला आहे . बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी अथवा टोळीतील अन्य सदस्यांसाठी अवैद्य आर्थीक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे कट रचुन , विश्वासघात करून फसवणुक करून , खंडणी मागणे , शस्त्राचा धाक दाखविणे , बनावट दस्तऐवज बनविणे, कट रचणे इत्यादी प्रकारचे गुन्हे करण्याचे सत्र सातत्याने चालु ठेवल्याचे निदर्शनास आले आहे . टोळी प्रमुख रविंद्र लक्ष्मण बहाटे व त्याचे टोळी सदस्य यांनी संघटीत टोळीच्या माध्यमातुन गुन्हा केला असल्याने प्रस्तुत गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन -१ ९९९ चे कलम ३ ( १ ) ( ii ) .३ ( २ ) .३ ( ४ ) चा अंतर्भाव करण्याबाबत .नामदेव चव्हाण , पोलीस उप महानिरीक्षक तथा अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग , पुणे शहर यांनी मंजुरी दिल्याने चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन या गुन्ह्यास मोक्का कायद्याची समाविष्ट करण्यात आली असुन प्रस्तुत गुन्ह्याचा पुढील तपास.रमेश गलांडे , सहायक पोलीस आयुक्त , खडकी विभाग , पुणे शहर हे करीत आहेत.अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन गंभीर गुन्ह्याचे ठिकाणी तसेच वारंवार गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारे यांचेवर कठोर व कडक कारवाई बाबत वैयक्तीक मार्गदर्शन करुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले होते . त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही ११ वी कारवाई असुन यावर्षातील ही ७ वी कारवाई आहे .