पुणे, दि. 5 :- दिनांक 1 जुलै 2016 पासून 5 टक्के खेळाडूंना वितरीत करण्यात आलेल्या क्रीडा प्रमाणपत्र वैधतेबाबत दिनांक 23 मार्च 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांच्या दालनामध्ये प्रमाणपत्राची फेरपडताळणी करण्यात येणार आहे, असे क्रीडा व युवक सेवा उपसंचालक विजय संतान यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.क्रीडा कार्यालयाकडून वितरीत करण्यात आलेल्या पॉवरलिफ्टींग, स्क्वॅश, सॉफ्टबॉल, कनोईंग अँड कयाकिंग, सेपकटकरा, आईस हॉकी या क्रीडा प्रकारातील प्रमाणपत्राची पडताळणी यावेळी करण्यात येणार आहे. सर्व खेळाडू व संघटनेचे अध्यक्ष, सचिव यांनी त्यांच्याकडे असलेल्या क्रीडा स्पर्धेच्या अहवालासह सुनावणीकरीता उपस्थित रहाण्याचे आवाहन उपसंचालक. संतान यांनी केले आहे.