पुणे दि २० :- चैनचोरी करणाऱ्या चोरावर मोक्का कायद्यातंर्गत कारवाई कायद्यातंर्गत कारवाई दि .०३/१०/ २०२० रोजी सकाळी ०६.५५ वा . चे सुमारास एक रिक्षावाला पुणे बाणेर या ठिकाणी थांबला होता.त्यावेळी फिर्यादी यांनी रिक्षावाल्यास तुम्ही कमीन्स इंडीया लि . कोथरुड , पुणे येथे येणार आहे का ? असे विचारले त्यावेळी रिक्षावाल्याने मीटरप्रमाणे येईल असे म्हणाला.तेव्हा फिर्यादीने त्यास नाही म्हणुन सांगून रिक्षा पासुन वळत असताना एका काळया रंगाची पल्सर मोटर सायकल वरुन दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांचे जवळ येवुन मोटर सायकलवरील पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादीचे गळयातील लॉकेटसह असलेली सोन्याची चैन १२ ग्रॅम वजन किंमत ३६,हजार रु.ची जबरदस्तीने चोरुन नेली म्हणुन चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हयातील खालील सराईत आरोपी यांना अटक करण्यात आली आहे . १ ) राजाभाऊ उर्फ राजुखेमु राठोड , वय -३६ वर्षे , रा . एकंबीतांडा , ता . औसा , जिल्हा- लातुर सध्या रा.सुंदराबाई शाळेजवळ , वडगावशेरी , चंदननगर , पुणे . २ ) नागेश रामप्पा बंडगर , वय -३४ वर्षे , रा . अशोक पुजारी यांचेघरा समोर , विवेकनगर , ता . रायबाग , जिल्हा बेळगाव , राज्य- कर्नाटक सदर आरोपींना अटक करुन त्यांचे कडे सखोल तपास केला असता सदर आरोपी हे स्वतःच्या नेतृत्वाखाली संघटीत टोळी तयार करुन चैन चोरी , जबरीचौरी व बॅग लिफ्टींग करीत असल्याचे पोलिसांनच्या निदर्शनास आले आहे. व सदर टोळी प्रमुख राजाभाऊ उर्फ राजुखेमु राठोड याने आरोपी सोबत कट कारस्थान रचुन व त्यांना आर्थिक मदत पुरवुन सदरचा गुन्हा बाणेर भागामध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी केल्याचे निष्पन्न झालेले आहे .दाखल गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई करणे बाबतचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक .अनिल शेवाळे , चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन यांना.पोलीस उप आयुक्त , परीमंडळ ४. पंकज देशमुख , यांचे मार्फत अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग , पुणे शहर नामदेव चव्हाण यांना सादर केला होता . सदर प्रस्तावाची छाननी केल्या नंतर सदर गुन्हयातील आरोपी नामे नागेश रामप्पा बंडगर हा राजाभाऊ उर्फ राजुखेमु राठोड याच्या टोळीचे सदस्य म्हणुन काम करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे . टोळी प्रमुख राजाभाऊ उर्फ राजु खेमु राठोड व त्याचा साथीदार नागेश रामप्पा बंडगर याने संघटित रित्या सदरचा गुन्हा केलेला आहे . आरोपींनी संघटीत गुन्हेगारी टोळी निर्माण करुन एकटयाने व संयुक्तरित्या स्वतःचे व टोळीचे वर्चस्व निर्माण करणे करीता व त्यातुन गैरवाजवी आर्थिक व इतर फायदा मिळविण्याकरीता केलेले आहे . सदर संघटीत गुन्हेगारी टोळीने बेकायदेशीर मार्गाने स्वत साठी , त्याचे टोळीच्या सदस्यासाठी गैरवाजवी आर्थिक तसेच आपल्या टोळीचे वर्चस्व व आपल्या टोळीची दहशत कायम ठेवण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी कृत्ये सातत्याने चालु ठेवले आहे . टोळीचे वर्चस्व जबरीचोरी , चैनचोरी , बॅग लिफ्टींग इत्यादी सारखे गुन्हेगारी कृत्ये आरोपींनी सातत्याने केलेली आहेत , आरोपी यांनी संघटीत टोळीच्या माध्यमातुन गुन्हा केलेला असल्याने दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १ ९९९ चे कलम ३ ( १ ) ( ii ) , ३ ( २ ) , ३ ( ४ ) या कलमाचा अंतर्भाव करण्याबाबत .नामदेव चव्हाण , अपर पोलीस आयुक्तपुर्व प्रादेशिक विभाग , पुणे शहर यांनी मंजुरी दिली आहे . त्या प्रमाणे चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन गुन्हया मध्ये मोका कायद्याची कलमे समाविष्ठ करण्यात आलेली असुन सदर गुन्हयाचा तपास.रमेश गलांडे , सहा . पोलीस आयुक्त , खडकी विभाग , पुणे शहर हे करीत आहेत. अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त , पुणे शहर यांनी कार्यभार घेतल्या नंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन गंभीर गुन्हयाच्या ठिकाणी स्वतः भेट देऊन कठोर व कडक कारवाई करणेबाबत , वैयक्तिक मार्गदर्शन करुन गुन्हयाचा सखोल तपास करुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर कटाक्षाने भर देण्यात येत आहे .