औसा दि १० :- औसा तालुक्यातील लामजना येथे दिनांक ९ फेब्रुवारी २०२० रोजी विद्या बालविकास इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन मोठया उत्साहात पार पडले. यावेळी
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लातुर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव यांच्या हस्ते . सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लामजना गावचे सरपंच जाहेदाबी पटेल, पंचायत समिती सदस्य मंगलबाई कांबळे,जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी रत्नाकर जवळगेकर, किल्लारी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद म्हेत्रेवार, दत्तात्रय पवार, उपसरपंच वाजीद बिरादार,माजी सरपंच रामप्रसाद बजाज आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी लामजना गावातील सामाजिक, शैक्षणिक, कृषी क्षेत्रातील विविध यशस्वी भूमिपुत्रांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये गटशिक्षण विकास अधिकारी शिवकुमार विठ्ठल बिराजदार, सामाजिक तथा अध्यात्मिक कार्यकर्ते माधव गोविंद शिंदे, यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त जितेंद्र शेळके, आदर्श शेतकरी इंद्रजित शिंदे, रफिक पटेल, व बालविकास केंद्राच्या शिक्षिका आम्रपाली पाटील यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी शिवकुमार बिराजदार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच लातुर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विद्या बालविकास केंद्र इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्या विध्यार्थ्यांनी आपली कला सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
तसेच लावणीसम्राट किरण कोरे यांनी धडाकेबाज लावणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष अतुल माधवराव शिंदे, अर्जुन शेळके, नितीन शिंदे, गणेश बिराजदार, योगेश शिंदे, नूर पटेल, दीपक गिरी,मन्मथ स्वामी, वैजिनाथ डिगुळे, नेताजी शिंदे, सुरज शिंदे, प्रल्हाद शिंदे, बालविकास केंद्राच्या शिक्षिका आमप्राली पाटील, मंडोदरी शिंदे, ऋतुजा शेळके ,जयबा पटवारी, सुग्रा पटवारी, पूजा जाधव आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश बिराजदार,प्रस्तावना संजयआबा शिंदे व आभारप्रदर्शन मन्मथ स्वामी यांनी मानले. कार्यक्रमाला लामजना गावातील पालकवर्ग ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
औसा लातुर प्रतिनिधी:- प्रशांत नेटके