पुणे,24 जानेवारी 2020: बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या वतीने आयोजित व मनिषा कन्स्ट्रक्शन आणि व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड प्रायोजित मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत वरिष्ठ बिलियर्ड्स मुलांच्या गटात पीएसपीबीच्या पंकज अडवानी, ब्रिजेश दमानी, आलोक कुमार, महाराष्ट्राच्या अरुण अगरवाल, राजीव शर्मा या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा सहज पराभव करून आगेकूच केली.पीवायसी हिंदू जिमखाना येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत वरिष्ठ बिलियर्ड्स गटात गटसाखळी फेरीत 23वेळा जागतिक विजेतेपद पटकावणाऱ्या पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डच्या पंकज अडवानी याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत ओडिशाच्या आशुतोष पाधीचा 3-0(151(111)-37, 151(62)-52, 152(84,68)-70) असा सहज पराभव केला. ग गटात 14 वेळा राज्यस्तरीय स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या व जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या महाराष्ट्राच्या अरुण अगरवाल याने पॉंडिचेरीच्या राज मोहन पी.चा 3-0(150-41, 150(138)-10, 150(62)-49) असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली. अरुण याने आपल्या खेळीत 138 गुणांचा ब्रेक नोंदविला.
इ गटात आशियाई क्रीडा स्पर्धेतील माजी विजेत्या पीएसपीबीच्या ब्रिजेश दमानी याने महाराष्ट्राच्या चंदू कसोदरियाचे आव्हान 3-0(150-07, 150(71)-131, 152(69)-27)असे मोडीत काढले. के गटात पीएसपीबीच्या आलोक कुमार याने महाराष्ट्राच्या महेश जगदाळेला 3-0(150(56)-129, 150-122, 150(50)-12) असे नमविले. तेलंगणाच्या कडियापू विभास याने आंध्रप्रदेशच्या एमएस रेड्डीचा 3-2(119-152, 151-137, 43-152, 150-115, 150-52) असा संघर्षपूर्ण पराभव केला. ओ गटात रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डच्या नीरज कुमार याने महाराष्ट्राच्या रिषभ कुमारचे आव्हान 3-0(151(78)-46, 151(125)-08, 150(50)-62) असे संपुष्टात आणत बाद फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी: वरिष्ठ बिलियर्ड्स:
गट ग: अरुण अगरवाल(महाराष्ट्र)वि.वि.राज मोहन पी.(पॉंडिचेरी)3-0(150-41, 150(138)-10, 150(62)-49);
गट ह: रुपेश शहा(पीएसपीबी)वि.वि.कुणाल अगरवाल(ओडिशा)3-0(151(124)-02, 150-77, 150(93)-37);
गट ह: रफत हबीब(आरएसपीबी)वि.वि.सिद्धार्थ पटनी(मध्यप्रदेश)3-0(150(80)-62, 152-146, 150(60)-96);
गट इ: ब्रिजेश दमानी(पीएसपीबी)वि.वि.चंदू कसोदरिया(महाराष्ट्र)3-0(150-07, 150(71)-131, 152(69)-27);
गट जे: अक्षय कुमार(उत्तरप्रदेश)वि.वि.अमित सप्रू(महाराष्ट्र)3-0(151(50,50)-122, 152(50)-57, 151-59);
गट जे: प्रेम प्रकाश(तामिळनाडू)वि.वि.शेखर सुर्वे(आरएसपीबी)3-0(150-31, 150(117)-64, 150-89);
गट के: आलोक कुमार(पीएसपीबी)वि.वि.महेश जगदाळे(महाराष्ट्र)3-0(150(56)-129, 150-122, 150(50)-12);
गट के: कडियापू विभास(तेलंगणा)वि.वि.एमएस रेड्डी(आंध्रप्रदेश)3-2(119-152, 151-137, 43-152, 150-115, 150-52);
गट म:राजीव शर्मा(महाराष्ट्र)वि.वि.बी. राजकुमार(कर्नाटक)3-1(150(65)-128(51), 136-151(68), 150(41)-79(58), 151(92)-127(74));
गट म: एल. दुर्गा प्रसाद(आरएसपीबी)वि.वि.आदित्य अगरवाल(आरएसपीबी)3-2(130-151, 150-107, 83-152, 150-121, 150-113);
गट न: कमल चावला(आरएसपीबी)वि.वि.तुषार श्रीस्टा(बीएसएफआय)3-0(151(110)-08, 151(99)-64, 151-21);
गट ओ: नीरज कुमार(आरएसपीबी)वि.वि.रिषभ कुमार(महाराष्ट्र)3-0(151(78)-46, 151(125)-08, 150(50)-62);
गट प: वरून कुमार(तामिळनाडू)वि.वि.अक्रम खान(पश्चिम बंगाल)3-1(66-152, 150-98, 150-66, 152-64);
गट प: रयान राझमी(महाराष्ट्र)वि.वि.केतन चावला(मध्यप्रदेश)3-0(152(97)-67, 150(56)-77, 150-128);
गट क्यू: के. वेंकटेशाम(आरएसपीबी)वि.वि.आयुष सिन्हा(बीएसएफआय)3-0(151-17, 150(114)-50, 150(81)-35);
गट क्यू: पंकज अडवानी(पीएसपीबी)वि.वि.आशुतोष पाधी(ओडिशा)3-0(151(111)-37, 151(62)-52, 152(84,68)-70).
पॅरा स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेस आजपासून प्रारंभ
पुणे, 24 जानेवारी: बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या वतीने पहिल्या पॅरा स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून हि स्पर्धा 25 आणि 26 जानेवारी या कालावधीत पीवायसी हिंदू जिमखाना येथे होणार आहे. 1988पर्यंत पॅरा स्नूकर स्पर्धा हि पॅरालिंपिक्समध्ये होत असे. त्यामुळे पॅरालिंपिक्स पुन्हा आयोजित करण्यात यावी, यासाठी वर्ल्ड डिसेबिलिटी बिलियर्ड्स अँड स्नूकर(डब्लूडीबीएस) प्रयत्न करीत आहेत. पुण्यात होणाऱ्या स्पर्धेत सहा खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये मुंबईच्या अनंत मेहता, चेन्नईच्या सी. बालाजी, पंजाबच्या हरबिंदर सिंग, कर्नाटकच्या शशी कुलकर्णी, साताऱ्याच्या शयान शेट्टी आणि मध्यप्रदेशच्या उदित राय यांचा समावेश आहे.