पुणे दि २१:- माझा रिअल हिरो माझा सफाईसेवक आयुक्त सौरव राव यांचे समवेत महापालिका आयुक्त यांची स्वच्छ सर्वेक्षण २०२० पाहाणीसाठी काल रात्री व्हिजिट घोले रोड ,कोथरूड व औंध क्षेत्रीय कार्यालयामध्ये झाली .
क्षेत्रीय कार्यालय येथे संदीप कदम उपस्थित होते तेथील पाषाण येथील लमान तांडा आरोग्य कोठीला रात्री ११.३० वा उशीरा भेट दिली तेव्हा तेथील सफाईसेवकासोबत फोटो आयुक्त यांनी काडला स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत पुणे महानगरपालिका व पुणे जिल्हा हौसिंग फेडरेशन यांचे संयुक्तपणे दिनांक २५ व २६ जानेवारी २०२० दोन दिवसीय प्रदर्शन गणेश कला क्रिडा या ठिकाणी आयोजन केले आहे.यामध्ये मुख्यत: कंपोस्टीग साठी घरच्या घरी कचरा कसा जिरवता येईन या घनकचरा संबंधित ,सौर व इतर अपारंपरिक ऊर्जा,रेन व रूफ वाॅटर हर्वेस्टिंग या संबंधीत स्टाॅल असतील. पुणे शहरातील सर्व हौसिंग सोसायटी व पुणे मनपा मिळून या चालू वर्षी दोन लाख प्राॅपर्टी मध्ये ओला कचरा जिरवण्याचे उदिष्टे ठेवण्यात आले आहे.सध्या पुणे शहरात ८४ हजार ठिकाणी कंपोस्ट,सोलर वा रेन हर्वेस्टींग होत आहे. यासाठी मनपाकडून मिळकत करामध्ये ५ किंवा १० टक्के सवलत दिली जात आहे. पुणे मनपाने १०० % ओपन डपिंग बंद केलेले आहे व आता १००% पुणे शहरातील कचरा पुणे शहरातच प्रक्रिया केली जात आहे यामध्ये सुध्दा यंत्रणेमध्ये येणारा ओला कचरा जागेवरच निर्मित होतो तेथे जिरवणे हे प्रमुख ध्येय आहे.यासाठी सबसिडी दिली जाणार आहे.