पुणे दि २१ : -भव्य अशी मातीतील हवेली अजिंक्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा २०२० ही महारुद्र काळेल(इंदापूर) याने जिंकली व चांदीची गदा पटकवली,द्वितीय क्रमांक पै.नानाजी झुंजुरके(मुळशी),तृतीय क्रमांक पै.पृथ्वीराज मोहोळ(मुळशी)यांनी मिळविला.डोणजे येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत सुमारे ४०० पहिलवानांनी सहभाग नोंदविला होता.आयोजक पै.भरत चौधरी व नवनाथ पारगे(मा.जि.प सदस्य) यांनी केले होते.या कार्यक्रम प्रसंगी पै.भरत चौधरी,नवनाथ पारगे(मा.जि.प सदस्य),प्रमुख पाहुणे गुरुवर्य संजीवजी नाईक,संसदरत्न सुप्रियाताई सुळे(खासदार),भीमराव तपकिर(आमदार),हेमंत रासने(स्थायी समिति अध्यक्ष पुणे),रमेश कोंडे(शिवसेना हवेली तालुका अध्यक्ष),राजाभाऊ लायगुडे(नगरसेवक),पै.मंगलदास बांदल(मा.जि.प सदस्य),अर्जुन पुरस्कार विजेते वस्ताद काका पवार,डबल हिंद केसरी जोगिंदर,हिंद केसरी योगेश दोडके,हिंद केसरी अमोल बाराटे,भारत केसरी विजय गावडे,महाराष्ट्र केसरी विकी बनकर,हभप राजेंद्र एप्रेमहाराज,हभप.संतोष पायगुडेमहाराज,विजय सातपुते(आदर्श सरपंच भूगाव),रामदास दांगट(मा.सरपंच शिवणे)आदी मान्यवर उपस्थित होते.