इंदापूर तालुका दिनांक २९ :- (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी दैनिक प्रभात चे इंदापूर तालुका प्रतिनिधी नीलकंठ मोहिते व कार्याध्यक्षपदी दैनिक पुढारीचे जावेद मुलाणी तर सचिवपदी दैनिक लोकमतचे सागर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पुणे येथील मुख्य कार्यालयात(रविवार ता 29 रोजी)राज्याचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते इंदापूर तालुका अध्यक्ष म्हणून म्हणून नीलकंठ मोहिते यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. संघटनेचे राज्य अध्यक्ष वसंत मुंडे,राज्य संघटक संजय भोकरे,तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष सीताराम लांडगे यांच्या सूचनेनुसार नियुक्ती करण्यात आली आहे.इंदापूर तालुक्यातील पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांनी दिली. यावेळी सोमनाथ देशकर,ज्येष्ठ पत्रकार मधुकर गलांडे,यांच्यासह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी इंदापूर तालुका :- बाळासाहेब सुतार