पुणे दि २८ :- नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ रविवारी ता.२९ पुणे शहरामध्ये गोळीबार मैदान ते कौन्सिल हॉलपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी ११ वाजल्यापासून मोर्चा संपेपर्यंत संबंधित रस्त्यावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात येनार आहे.रविवारी सकाळी अकरा वाजता गोळीबार मैदान येथे मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतर हा मोर्चा सेव्हन लव्हज चौकातून नेहरू रस्त्याने सोनवणे हॉस्पिटल, रामोशी गेट, संत कबीर चौक, पॉवर हाऊस चौक, नरपतगीर चौक, मालधक्का चौक, ससून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, साधू वासवानी चौकामार्गे कौन्सिल हॉल येथे जाणार आहे.”या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होणार आहेत.त्यामुळे वाहतुक सुरळीत व सुरक्षित सुरू राहण्यासाठी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा”, असे आवाहन वाहतुक शाखेचे अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे व पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु यांनी केले आहे.बंद करण्यात आलेले मार्ग आणि कंसात पर्यायी मार्ग- गोळीबार मैदान चौक ते स्वारगेटकडील मार्ग (गोळीबार मैदान चौकातून डावीकडे वळून सीडीओ चौक गिरीधर भवन मार्गे पुढे)- सीडीओ चौक ते गोळीबार मैदान (खटाव बंगला चौक, नेपीयर रोड, मम्हादेवी चौक किंवा वानवडी बाजार चौक),- सेव्हन लव्हज चौक ते गोळीबार मैदान (सॅलिसबरी पार्क, सीडीओ चौक, भैरोबानाला)
– सोलापूर रस्त्यावरील मम्मादेवी चौक (मम्मादेवी चौक, बिशप स्कूल मार्गे कमांड हॉस्पिटल)
– भैरोबानाला ते गोळीबार मैदान (प्रिन्स ऑफ वेल रोड किंवा भैरोबानाला वानवडी बाजार चौकमार्गे)
– कोंढव्याकडून गोळीबार मैदान (लुल्लानगर चौकातून भैरोबानाला चौक किंवा गंगाधाम चौकमार्गे)
– जेधे चौक (स्वारगेट) ते गोळीबार मैदान (जेधे चौक, मार्केट यार्ड चौक, वखार चौक ते गंगाधाम चौक)
– मार्केट यार्ड ते मालधक्का चौक (डायस प्लॉट ते व्होल्गा चौक, सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक)
– शाहीर अमर शेख चौक (आरटीओ चौकातुन जहाँगीर रुग्णालय)- येरवड्याकडून आयबी चौक (मंगलदास चौकातुन जहाँगीर चौक मार्गे इच्छितस्थळी)
– जहाँगीर हॉस्पीटल, आयबीकडे जाणारी वाहतूक (ब्ल्यू डायमंड चौकातून सर्कीट हाऊस चौकामार्गे पुढे)