जळगाव दि,१७:-जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वैजापूर येथे दिनांक 13. ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका नराधमाने दोन आदिवासी अल्पवयीन मुलींना वय वर्ष 5 व 6 हिला फूस लावून गावापासून वैजापूर ते कर्जना जाणारा रस्ता लगत शेतात घेऊन गेला व तेथे अमानुस अत्याचार केले त्यातील सहा वर्षीय बालिका तिच्यावर अमानुष प्रमाणे काळिमा फासणारे नराधमाने कृत्य केल्याने ती बालिका अत्यवस्थ स्थितीत आहे ,ही घटना दिनांक 13 रोजी रात्री साडेआठ वाजता घडली,होती व त्याच दिवशी आदिवासी समाजाचे समाजसेवक डॉक्टर चंद्रकांत बरेला यांनी वैजापूर येथे जाऊन त्या बालिकेवर प्रथम उपचार करून ,तिला चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे रात्री साडेनऊ वाजता दाखल केले परंतु बालिकेची प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे तिला जळगाव येथे हलवण्यात आले आहे, आणि तिला न्याय मिळण्यासाठी नराधमाला फाशी मिळण्यासाठी दिनांक 16 ऑगस्ट रोजी चोपडा येथे जन अक्रोष मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते ह्या मोर्चात सर्व पक्षाचे सर्व धर्माचे सर्व जातीचे लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत यांनी सहभाग नोंदवला.होता सदरहू मोर्चा हा चोपडा येथील विश्राम गृहा पासून ते चोपडा तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेला होता या मोर्चात पाच हजार लोकांनी सहभाग घेतला होता चोपड्यातील सामाजिक संस्थे पासून तर राजकारण्यांपासून तर सर्वसामान्य नागरिकांपासून सगळ्यांनी सहभाग नोंदवला, होता मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यानंतर माननीय तहसीलदार यांना शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींच्या हस्ते निवेदन देण्यात आले .निवेदनात खालील मागण्या मांडण्यात आल्या 1) आरोपी नराधमास फाशी ही झालीच पाहिजे 2 )आरोपीवर एक्ट्रा सिटी चा गुन्हा दाखल करण्यात यावा 3 )सदरहू गुन्हा हा शीघ्रगती न्यायालयात चालविण्यात यावा 4) सदरहू गुन्ह्यासाठी खानदेश मातृभुमीत जन्मलेले विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट माननीय उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी 5) दोघी पिडीत बालिकेचा पुढील शैक्षणिक व इतर सुविधांची जबाबदारी ही शासनाने करावी 6) सदर हू कुटुंबाच्या पुनर्वसनाची जबाबदारी घ्यावी असे निवेदन देण्यात आले
विलास पाटील (चौधरी) जळगाव प्रतिनिधी