निरा नरसिंहपूर:दि.26 :- महाराष्ट्राच्या विधिमंडळात मंञी म्हणून एकुण 19 वर्षे प्रभावीपणे काम केलेले काॅग्रेसचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी विधिमंडळातील कामकाजावरती अभ्यासूपणे लिहिलेल्या ” विधानगाथा ” या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात मंगळवार (दि.30) रोजी सायंकाळी 5 वा.होत आहे.सदर कार्यक्रम हा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.विशेष म्हणजे या पुस्तक प्रकाशन समारंभास सध्या राज्यात असलेले सर्व 7 माजी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.विद्यमान मुख्यमंत्री व सर्व 7 माजी मुख्यमंञी प्रथमच एकञ येत आहेत.मुंबईत हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी(दि.23) भेट घेऊन पुस्तक प्रकाशन समारंभांचे निमंत्रण दिले. सदर प्रसंगी पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील,राजवर्धन पाटील उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचे पुणे जि.प.पोटनिवडणूकीत राज्यात सर्वाधिक मताधिक्य्याने विजयी झालेबध्दल अभिनंदन केले.जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी राज्यात 6 मुख्यमंत्र्यांच्या मंञीमंडळात काम करीत असताना संसदीय कार्यसह अनेक महत्वाची खाती कार्यक्षमतेने सांभाळत नावारूपास आणली.त्यांनी सलगपणे 10 वर्षे संसदीय कार्यमंञी म्हणून उत्कृष्टपणे काम केले.राज्य विधिमंडळातील या उत्कृष्ट कामकाजाबध्दल देशाच्या तात्कालिक राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते हर्षवर्धन पाटील यांना ” विकासरत्न ” हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे सर्वोच्च सभाग्रह असलेल्या विधीमंडळाच्या कामकाजातील महत्त्वाच्या घटना, व प्रसंग आदि उपयुक्त माहिती या पुस्तकात आहे.या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री सर्वश्री मनोहर जोशी, सुशिलकुमार शिंदे,नारायण राणे,पृथ्वीराज चव्हाण,अशोक चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर उपस्थित राहणार आहेत.त्याचप्रमाणे विधानसभेचे सभापती हरीभाऊ बागडे,विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर,भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंञी चंद्रकांत पाटील, संसदिय कार्यमंत्री विनोद तावडे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोरे,माजी सभापती दिलिप वळसे पाटील, काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात,माजी सभापती अरूण गुजराथी, विधानसभेचे उपसभापती विजय औंटी उपस्थित राहणार आहेत. विधानपरिषदेचे माजी आमदार उल्हासदादा पवार हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत.तात्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी संसदिय कार्यमंञी या खात्याची जबाबदारी तरूण मंञी म्हणून माझेकडे दिली होती,त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवला असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.