पुणे दि२३ :- पुणे शहरातील जुना बाजार हा रस्त्यावर भरू नये आणि येथील रस्त्यावर पार्किंग देखील होवू नये या अनुषंगाने आज पुणे पोलिसांनी महत्वाची पावले उचलली असून प्रायोगिक तत्वावर महिनाभराच्या कालावधीसाठी अधिसूचना आज काढली आहे.शाहीर अमरवेस चौक ते कुंभार वेस दरम्यान च्या मंगळवार पेठेतील रस्त्यावर दर रविवारी आणि बुधवारी जुना बाजार रस्त्यावर भरतो .या रस्त्याच्या एका बाजूला न्यायालय ,महापालिका ,शनवारवाडा,शिवाजी नगर बस स्थानक ,रेल्वे स्थानक आहे तर दुसऱ्या बाजूस ससून हॉस्पिटल ,जिल्हाधिकारी कार्यालय ,सेन्ट्रल बिल्डींग ,विधान भवन ,पुणे स्टेशन , आर टी ओ ,जिल्हा परिषद ,विधान भवन अशी कार्यालये आहेत . दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहने वाढत आहेत आणि एकूणच पुण्यातील वाहतूक समस्या जिकिरीची होत आहे .शाहीर अमरवेस चौक ते कुंभार वेस दरम्यान वाहतुकीचा मोठा खोळंबा रस्त्यावर भरणारी दुकाने आणि पार्किंग मुळे होतो .
याबाबत अनेक तक्रारी येतात असे या अधिसूचनेत म्हटले आहे .वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी वाहतूक नियमना साठी सुधारित अधिसूचना सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांनी काढली आहे .२४ जुलै पासून ती लागू करण्यात येत असून या नुसार प्रायोगिक तत्वावर या रस्त्याच्या दोन्ही बाजूस नो पार्किंग झोन आणि रस्त्यावर दुकाने लावण्यास बंदी घालण्यात येते आहे . रिक्षा थांबे , अम्ब्युलंस, पोलीस आणि अग्निशामक दल आणि कर्तव्यावर असलेली शासकीय वाहने यांना यातून वगळण्यात येते आहे . असे या अधिसूचनेत म्हटले आहे .