निरा नरसिंहपूर: दि.23 :-माजी सहकार मंञी हर्षवर्धन पाटील यांची नवी दिल्ली येथिल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघा(एनएफसीएसएफ)च्या संचालकपदी आज मंगळवारी (दि.23) निवड करण्यात आली.राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष दिलिप वळसे पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांना संचालकपदी निवड झाल्याचे पञ दिले.देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे या निवडीसाठी पाटील यांना सहकार्य लाभले. नवी दिल्ली येथे देशातील सहकारी साखर कारखान्यांची राष्ट्रीय पातळीवरील काम करणारी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ ही महत्त्वाची प्रमुख संस्था आहे.देशातील साखर उद्योगाला मार्गदर्शन करणे तसेच साखर उद्योगा पुढील अडचणी केंद्र सरकारकडून सोडवून घेण्याचे काम राष्ट्रीय साखर कारखाना संघाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.राज्याचे सहकार खाते हर्षवर्धन पाटील यांनी अनेक वर्षे प्रभावीपणे सांभाळले.राज्यातील साखर उद्योगातील अभ्यासू नेते म्हणून राज्यात हर्षवर्धन पाटील काम करीत आहेत.महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ मुंबई तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी ब्रु. या राज्यातील साखर उद्योगातील दोन प्रमुख संस्थांचे संचालक म्हणूनही सध्या हर्षवर्धन पाटील कामकाज पाहत आहेत.
बाळासाहेब सुतार निरा प्रतिनिधी