हदगाव दि,२१ :- प्रतिनिधी संदीप सोनुले, आजच्या काळात कोणी कोणाला मदत देत असेल तर आपला काहीतरी स्वार्थ किंवा प्रसिध्दीसाठी सोशल मीडिया,वृतमानपत्राचा, फोटो काढण्यासाठी स्पर्धा लागली आहे.पण नांदेड येथील साईप्रसाद परीवारात अध्यक्ष सचिव असा कोणताही चेहरा समोर न येता नावापैक्षा कार्य मोठे व्हावे यासाठी मदतीसाठी काम करत असताना साईप्रसादच्या पारदर्शक व्यवहारामुळे सदस्य संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून अडीच हजार च्यावर सदस्यांकडून अनेक सामाजिक बांधिलकी उपक्रम राबविण्यात येत असून शासकीय रुग्णालयातील नातेवाईकांना अडचणीत जेवण व पिण्यासाठी होत असलेल्या गैरसोयीत ईश्वर रुपी धावुन दररोज विष्णूपुरी येथे दोन वेळेस जेवण व पिण्यासाठी शुद्ध थंड पाणी असे अनेक सामाजिक उपक्रमात साईप्रसाद परीवार अग्रेसर दिसून येत आहे.
आज पळसा येथील आत्महत्या ग्रस्त मुलीच्या लग्नातील कन्यादानासाठी साईप्रसादने मदत केली आहे.
पळसा ता.हदगांव येथील शेतकरी बालाजी सटवा मुळे यांनी सततच्या नापीकीमुळे कर्जबाजारीला कंटाळून ९ एप्रिल रोजी आत्महत्या केली होती. त्यांच्या मुलीचा विवाह वडगाव येथील मुलांशी जुळला असुन २६ एप्रिल रोजी वडगाव येथे विवाह पार पडत असल्याचे वृतमानपत्रातुन कळल्यावर गेल्या वर्षी हदगाव तालुक्यातील ९ वडीलाचे छत्र नसलेल्या मुलीच्या विवाहाच्या कन्यादान साठी आईवर पडलेल्या जबाबदारी वर ईश्वर रुपी धावुन येणारा साईप्रसाद ने कन्यादानासाठी लागणारे सर्व साहित्य व अन्नधान्य विवाहाच्या अगोदर आठ दिवस अगोदर घरी आणून दिलेल्या साईप्रसाद परीवार नांदेड यांनी आज २१ रोजी पळसा येथे अर्चना मुळे यांच्या कन्यादानासाठी विवाहासाठी लागणारे मणी मंगळसूत्र, जोडवे, ड्रेस,साडी, वधुवरासाठी लागणारे सर्व मेकपसहीत , साहित्य,गांधी, संसार उपयोगी भांडी ईतर साहित्य व गव्हाचा आटा,तेल, तांदूळ, साखर, चटणी मसाला इत्यादी साहित्य व पर्यावरण संतुलित राखण्यासाठी उपयुक्त असलेल्या महत्त्वाचे वृक्ष लावुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.या सामाजिक बांधिलकीचे परीसरात कौतुक केले जात आहे.
तिनं वर्षांपासून दुष्काळ जन्य परीस्थितीत आर्थिक स्थितीमुळे होत असलेल्या शेतकरी आत्महत्या, गरजु साठी साईप्रसाद परीवाराकडुन गेल्या पाच वर्षांपासून याही वर्षी च्या अतीशय नियोजन पद्धतीने पार पडत असलेल्या विवाह सोहळ्याचे ग्रामीण भागातील वधुवर च्या नातेवाईकांकडून कौतुक केल्या जात आहे.